छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करून घराघरात ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिव्यांका त्रिपाठी हिचाही समावेश होतो. दिव्यांकाला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही जोरदार सक्रिय असते. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, तिने नुकतेच असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. तिने खुलासा केला आहे की, हा व्हिडिओ तिच्याकडून चुकून पोस्ट झाला आहे.
दिव्यांकाने चुकून शेअर केला व्हिडिओ
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तिचा पती विवेक दहिया (Vivek Dahiya) याच्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये या गोष्टीचा खुलासा केला की, हा व्हिडिओ तिच्याकडून चुकून पोस्ट करण्यात आला आहे. दिव्यांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि हा चुकून शेअर झाला. आता याची मजा लुटा.”
View this post on Instagram
‘अशा चुका करत राहा’
दिव्यांका या व्हिडिओत पती विवेकसोबत पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये एक रोमँटिक इंग्रजी गाणे ऐकू येत आहे. लांब ड्रेसमध्ये दिव्यांका आपले केस झटकताना खूपच सुंदर दिसत आहे. तिने जरी हा व्हिडिओ चुकून पोस्ट केल्याचे म्हटले असले, तरी तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. चाहते या व्हिडिओसाठी विवेक आणि दिव्यांकाला आवडते जोडप्याचा टॅग दिला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “कृपया तुम्ही अशा चुका वारंवार करत राहा. आम्हाला खूप आवडतं हे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “ओह किती गोड दिसत आहेस.”
वेबसीरिजमध्ये झळकणार दिव्यांका
अभिनेत्री दिव्यांकाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच एका नवीन वेब प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिने यापूर्वी अल्ट बालाजीच्या ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ या वेबसीरिजमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती तन्वीर बुकवाला यांच्या डिंग इन्फिनिटी आणि जिओ स्टुडिओजच्या प्रोजेक्टवर काम करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! गर्लफ्रेंड वयात आल्यावर ब्रेकअप करतो अभिनेता? आता प्रसिद्ध मॉडेलसोबत जोडलं गेलंय नाव
अर्रर्र! गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगला खावी लागली कानाखाली, पण कुणी केलं हे कृत्य?
हृदयद्रावक! सिनेजगतात क्रांती घडवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन, चाहते दु:खाच्या सागरात