बाबो! गर्लफ्रेंड वयात आल्यावर ब्रेकअप करतो अभिनेता? आता प्रसिद्ध मॉडेलसोबत जोडलं गेलंय नाव

0
51
Leonardo-DiCaprio

हॉलिवूड सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रियो याने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कॅमिला मोरोन हिच्याशी ब्रेकअप केले होते. दोघांनी जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केले होते. यानंतर त्यांनी जीवाभावाचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही वेगळे झाले. अनेकांनी असा दावा केला होता की, अभिनेत्री 25 वर्षांची झाल्यामुळे अभिनेत्याने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही, तर काहींनी असेही म्हटले होते की, तो प्रत्येक गर्लफ्रेंड 25 वर्षांची झाल्यानंतर ब्रेकअप करतो. मात्र, जेव्हा तो 27 वर्षीय मॉडेल गिगी हदीद हिच्यासोबत दिसला, तेव्हा हे सर्व दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले.

असे म्हटले जात आहे की, लिओनार्डा डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) आणि गिगी हदीद (Gigi Hadid) एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही न्यूयॉर्क फॅशन वीकदरम्यान झालेल्या एका पार्टीमध्ये मित्रांसोबत दिसले. माध्यमांमध्ये या दोघांचेही फोटो झळकताना दिसत आहेत. यामध्ये लिओनार्डो आणि गिगी एकमेकांच्या शेजारी बसले आहेत आणि चर्चा करताना दिसत आहेत. कदाचित हे दोघेही त्यांचे नाते गुपचूप पुढे घेऊन जात आहेत. ते दोघेही पॅपराजींसमोर जाणे टाळताना दिसतायेत. अशात सोशल मीडियावर त्यांचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

नुकताच झाला होता लिओनार्डोचा ब्रेकअप
अभिनेता लिओनार्डो हा 47 वर्षांचा आहे. त्याने त्याच्यापेक्षा 23 वर्षे लहान असलेल्या कॅमिला मोरोनला डेट केले होते. 2017मध्ये त्यांच्या नात्याविषयीच्या बातम्या आल्या होत्या. ते दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. अभिनेत्याने त्याचे नाते वैयक्तिक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले होते. शेवटी 3 वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर ते प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसू लागले होते. आता असंच काहीसं पुन्हा घडताना दिसत आहे. मात्र, ते दोघेही त्यांचे नाते कधी अधिकृत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लिओनार्डोने अनेक अभिनेत्रींना केलंय डेट
लिओनार्डो डिकॅप्रियो याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. या यादीत सुपरमॉडेल गिसेले बुंडचेन, बार रेफेली, आणि अभिनेत्री ब्लेक लाईव्हली यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, लिओनार्डोच्या या सर्व गर्लफ्रेंड्सचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नव्हते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगला खावी लागली कानाखाली, पण कुणी केलं हे कृत्य?
हृदयद्रावक! सिनेजगतात क्रांती घडवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन, चाहते दु:खाच्या सागरात
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here