Friday, April 26, 2024

हृदयद्रावक! सिनेजगतात क्रांती घडवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन, चाहते दु:खाच्या सागरात

हॉलिवूडमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट निर्माते जीन ल्यूक गोडार्ड यांना देवाज्ञा झाली आहे. साठच्या दशकात आपल्या ‘ब्रेथलेस’ या सिनेमातून सिनेजगतात क्रांतिकारी बदलाची सुरुवात करणाऱ्या जीन यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, गोडार्ड यांच्या जवळच्यांनी माहिती दिली की, मंगळवारी (दि. 13 सप्टेंबर) लेक जिनेव्हामध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांच्या जवळच होते.

साठच्या दशकात जीन ल्यूक गोडार्ड (Jean Luc Godard) यांनी फ्रान्सच्या चित्रपट निर्मितीच्या इतिहासात नवीन क्रांती आणली होती. त्यांनी जुन्या विचारांवर चालण्यास नकार देत आपल्या मित्रांसोबत आपल्या शैलीत सिनेमे बनवण्यास सुरुवात केली होती. गोडार्ड यांच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या आशय आणि कलाकुसरीच्या माध्यमातून फ्रेंच तसेच हॉलिवूड सिनेमांसमोर खडतर आव्हाने मांडली होती.

जागतिक स्तरावर सोडली छाप
गोडार्ड यांची ओळख साठच्या दशकातील प्रसिद्ध ‘न्यू वेव्ह सिने मूव्हमेंट’शी जोडलेली आहे. गोडार्ड यांच्या चित्रपटांनी त्यांच्या समकालीन आणि नंतरच्या पिढ्यांतील दिग्दर्शकांवर प्रभाव टाकला. त्यामध्ये मार्टिन स्कोर्सेस, बर्नार्डो बर्टोलुची आणि पियरे पाओलो पसोलिनी यांचा समावेश आहे.

अशाप्रकारे वाढला सिनेमातील रस
गोडार्ड यांचा जन्म 3 डिसेंबर, 1930मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका समृद्ध कुटुंबात झाला होता. मात्र, जेव्हा ते चार वर्षांचे होते, तेव्हाच त्यांचे कुटुंब स्वित्झर्लंडला आले होते. ते सुरुवातीपासूनच सिनेप्रेमी नव्हते. मात्र, लेखक मालरोंच्या सिनेमावर प्रकाशित निबंध वाचल्यानंतर सिनेमातील त्यांचा रस वाढू लागला. यानंतर त्यांनी सिनेजगतातच क्रांती आणली. सुरुवातीला गोडार्ड हे त्यांच्या मित्रांसोबत सिनेमाचे टीकाकार बनले. त्यानंतर फ्रान्समध्ये न्यू वेव्ह सिने आंदोलन सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या प्रत्युत्तरात आपल्याच शैलीत सिनेमे बनवू लागले. त्यांचा पहिला सिनेमा ‘ब्रेथलेस’ हा होता. हा सिनेमा त्यांनी एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून बनवला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात
सासू आणि आईने घेतला पुढाकार, आलियाच्या ‘बेबी शॉवर’ची सुरू झाली जोरदार तयारी
बाबो! एक, दोन नव्हे; तब्बल 27 वर्ष थिएटरमध्ये गाजले ‘हे’ चित्रपट

हे देखील वाचा