अर्रर्र! गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगला खावी लागली कानाखाली, पण कुणी केलं हे कृत्य?

0
79
Ranveer-Singh

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो सतत त्याच्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून रणवीर सिंग आहे. रणवीर त्याच्या दमदार अभिनयासोबतच हटके ड्रेसिंग सेन्स आणि विचित्र कृतीमुळे चर्चेत असतो. न्यूड फोटोशूटमुळे भलताच चर्चेत आलेला रणवीर नुकताच साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2022मध्ये रेड कार्पेटवर दिसला. यावेळी त्याने धमाकेदार अंदाजात एन्ट्री केली होती. यादरम्यान त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी जमलेली. यावेळी असे काही घडले की, जे पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावतील.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2022 (SIIMA) या सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो त्याचा गाल पकडताना दिसत आहे.

रणवीर सिंगला कुणी मारली चापट?
झालं असं की, रणवीर सिंग बंगळुरू येथे पार पडलेल्या सिम्मा पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर स्पॉट झाला होता. यादरम्यान रणवीरला पाहताच तेथील चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी रणवीर चाहत्यांच्या गर्दीत वाईटरीत्या अडकला होता. यादरम्यान रणवीरच्या गालावर गर्दीतील कुणाचातरी हात लागला, त्यानंतर तो बिथरताना दिसला.

असे म्हटले जात आहे की, अभिनेत्याला गर्दीतून वाचवण्याच्या नादात बॉडीगार्डचा हात त्याच्या गालावर लागला. मात्र, असे होऊनही रणवीरने स्वत:चे नियंत्रण सुटू दिले नाही आणि तो एकदम शांत राहिला. तो हसत-हसत त्या गर्दीतून बाहेर पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर चाहते प्रतिक्रियांचा पाऊसदेखील पाडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

रणवीरला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार
नुकताच अभिनेता रणवीर सिंग याला ’83’ या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. या सिनेमात त्याने दिग्गज भारतीय माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली होती. पुरस्कारा मिळाल्यानंतर रणवीर भावूक झाला होता.

कोणत्या सिनेमा झळकणार रणवीर?
रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. हा सिनेमा 10 फेब्रुवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

साऊथमध्येही आहे रणवीरची क्रेझ
सिम्मा पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीरसाठी चाहत्यांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. त्याचा साऊथमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. यादरम्यान त्याला साऊथमधील सर्वोत्तम हिंदी अभिनेत्याच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यावेळी रणवीरने कमल हासन, अल्लू अर्जुन, संगीताकर देवी श्री प्रसाद, ‘केजीएफ’ स्टार यश, विजय देवरकोंडा यांच्यासोबत चांगला वेळ घालवला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हृदयद्रावक! सिनेजगतात क्रांती घडवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन, चाहते दु:खाच्या सागरात
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात
सासू आणि आईने घेतला पुढाकार, आलियाच्या ‘बेबी शॉवर’ची सुरू झाली जोरदार तयारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here