बॉलिवूडमध्ये दररोज अनेक लोकं कलाकार होण्याच्या उद्देशाने येत असतात, मात्र सर्वांनाच त्यांच्या या प्रयत्नात यश मिळते असे नाही. मात्र असे देखील कलाकार आहेत, ज्यांना अपेक्षित यश मिळत नाही, पण त्यांचे तुफान नाव होते. चित्रपट भलेही फ्लॉप दिले असतील, मात्र या फ्लॉप सिनेमातून देखील काही कलाकारांनी त्यांची मोठी ओळख निर्माण केली आहे. अशी एक अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. ‘जन्नत २’ फेम ईशा गुप्ता जरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, किंवा बहुतकरून मल्टीस्टारर सिनेमांमध्ये दिसली असली तरी ईशाने स्वतःची मोठी ओळख आणि फॅन फॉलोविंग निर्माण केली आहे. आज (२८ नोव्हेंबर) ईशा तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती.
ईशाचा जन्म २५ नोव्हेंबर, १९८५ साली दिल्लीमध्ये झाला. तिचे वडील वायुदलात अधिकारी होते तर आई गृहिणी होती. ईशाला नेहा नावाची एक बहीण आहे. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना सतत शहरं बदलावी लागत होती. ईशाचे बालपण डेहराडून, हैद्राबाद आणि दिल्लीमध्ये गेले. तिने मणिपाल विद्यापीठातून मास कम्युनिकेशनची पदवी संपादन केली.
ईशा २००७ साली फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत तिला ‘मिस फोटोजनिक’ हा पुरस्कार मिळाला आणि ती ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’ बनली. पुढे २०१० साली तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट देखील केले. सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. अखेर ईशाने महेश भट्ट यांच्या ‘जन्नत २’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
‘जन्नत २’ सिनेमात तिच्यासोबत इमरान हाश्मी होता. हा सिनेमा तुफान गाजला. सिनेमासोबत या चित्रपटातील गाणी देखील तुफान गाजली. ईशाने तिच्या पहिल्या सिनेमातूनच तिची ओळख बनवली. त्यानंतर ईशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ‘राज 3D’, ‘चक्रव्हुय’, ‘हमशकल’, ‘रुस्तम’, ‘बाद्शाहो’, ‘कमांडो २’, ‘टोटल धमाल’ आदी अनेक सिनेमे तिने केले.
ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जोली’ देखील म्हटले जाते. एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी ईशाला ‘अँजेलिना जोली’ म्हटले होते. याबद्दल एकदा ईशाला विचारले गेले होते. तेव्हा ती म्हणाली, “मी असा कधीच विचार करत नाही. मी एकदा माझ्या फोटोंसोबत अँजेलिनाचे काही फोटो कोलाज केलेला एक फोटो पाहिला होता. तेव्हा मला ठीक वाटले. अँजेलिना हॉलिवूडची सर्वात होती अभिनेत्री आहे. मला देखील ती खूप आवडते. खरं सांगायचे झाले तर, मला वाटते की, मी माझ्या आईसारखी दिसते.”
पुढे ईशा म्हणाली की, “जेव्हा मला गरिबांची अँजेलिना जॉली म्हटले जाते, तेव्हा मला खूप राग येतो. मला वाटते की, जेव्हा ते मला गरिबांची अँजेलिना जॉली म्हणतात तेव्हा ते स्वतःलाच गरीब ठरवतात. मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईवडिलांमुळे.”
ईशा सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. ती तिच्या फिटनेसबद्दल देखील खूप सजग आहे. ईशा नेहमीच तिचे योगा करतानाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यासोबतच ती अतिशय बोल्ड फोटो देखील शेअर करते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा टॉपलेस फोटो शेअर केला होता. ज्यात ती कॅमेऱ्याकडे पाठ करून उभी होती, आणि तिने फक्त जीन्स घातली होती. ती या फोटोमुळे खूप ट्रोल देखील झाली होती.
ईशाने देखील कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. एका निर्मात्याने तिला रोलच्याबद्ल्यात कॉम्प्रजमाईज करायला सांगितले होते. मात्र मोठ्या हुशारीने तिने स्वतःला यातून वाचवले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा
-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?