Tuesday, June 25, 2024

काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. कधी त्या आपल्या आलिशान राहणीमानामुळे, तर कधी भलत्याच वादात अडकल्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधतात. असेच काहीसे झाले आहे ते म्हणजे, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबाबत. जॅकलिन सध्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी तिच्या प्रवक्त्याने अभिनेत्रीकडून एक निवेदन जारी करत म्हटले होते की, ती सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉलसोबत जोडलेली नव्हती. मात्र, यावर अनेकांना विश्वासच बसत नाहीये. कारण, एक असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, असे वाटते की, जॅकलिन आणि सुकेशमध्ये काहीतरी सुरू आहे. (Actress Jacqueline Fernandez Is Having Affair With Conman Sukesh Chandrasekhar Know Reason)

फोटोने उडवली खळबळ
जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) नात्याबाबत असे वृत्त येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही २३ ऑक्टोबर रोजी चंद्रशेखर यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, जॅकलिन २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेशला डेट करत होती. आता दोघांचाही एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे दिसत आहे. दोघांमधील बाँडिंग फोटो स्पष्ट दिसत आहे.

जामीनानंतर जॅकलिनसोबत झाली होती पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट
माध्यमांतील वृत्तांनुसार, हे फोटो त्यावेळचे आहेत, जेव्हा सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगातून जामीनावर बाहेर आला होता. तिहार सोडल्यानंतर तो विमानाने चेन्नईला गेला आणि त्याने तेथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जॅकलिनची भेट घेतली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, तो मोबाईलच्या मदतीने जॅकलिनसोबतचे क्षण टिपण्याचा प्रयत्न करत आहे.

हैराण करणारी गोष्ट
माध्यमांंतील वृत्तांनुसार, ज्या फोनमध्ये तो जॅकलिनसोबत त्याचे फोटो काढत आहे, हा तोच आयफोन आहे, ज्यामध्ये त्याने इस्रायली सिमकार्डचा वापर करून २०० कोटींची उधळपट्टी केली होती. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, जामीनादरम्यानही सुकेश याच मोबाईलचा बिनदिक्कत वापर करत होता.

नात्यावर जॅकलिनच्या प्रवक्त्याचे वक्तव्य
जॅकलिन आणि सुकेश यांच्यातील संबंधांबाबत वकील अनंत मलिक यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर जॅकलिनच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, “ईडी जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावत आहे. तिने तिचे जबाब नोंदवले आहेत आणि भविष्यातील तपासातही ती एजन्सीला पूर्ण सहकार्य करेल. जॅकलिनने या जोडप्यासोबतच्या नातेसंबंधाबाबत केलेल्या कथित निंदनीय विधानांचे खंडन केले आहे.”

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘भूत पोलीस’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत होते.

हे देखील वाचा