Sunday, June 23, 2024

‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

कलाकार जेव्हा मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा जलवा दाखवतात, तेव्हा त्यामागे त्यांचे भरपूर कष्ट असते. काही ऍक्शन चित्रपटांमध्ये तर कलाकार आपला जीव ओतून पात्र पडद्यावर जिवंत करतात. यादरम्यान त्यांना दुखापतींचाही सामना करावा लागतो. आता असेच काहीसे बॉलिवूड सुपरस्टारसोबत घडले आहे. तो सुपरस्टार इतर कोणी नसून शाहिद कपूर आहे. शाहिद सध्या आपल्या ‘जर्सी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चाहत्यांची या चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी शाहिदने इंस्टाग्राम लाईव्ह सेशनचे आयोजन केले होते. यादरम्यान चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावर त्याने खुलासा केला की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो वाईट पद्धतीने जखमी झाला होता.

शाहिदला त्याच्या चाहत्याने विचारले की, ‘जर्सी’च्या शूटिंगदरम्यान ट्रेनिंगचा अनुभव कसा होता? यावर उत्तर देताना शाहिदने खुलासा केला की, ट्रेनिंगदरम्यान त्याच्यासोबत एक वाईट घटना घडली होती. त्याच्या ओठांना दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला तब्बल २५ टाके घालावे लागले होते. महत्त्वाचे म्हणजे, अभिनेत्याने आपली दुखापतही चाहत्यांना दाखवली. (Actor Shahid Kapoor Revealed Had To Get 25 Stitches After Being Badly Injured During The Shooting of Jersey)

ओठांवर दुखापतीनंतर घातले होते २५ टाके
शाहिदने आपल्या दुखापतीबाबत सांगताना म्हटले की, “मी या चित्रपटादरम्यान आपल्या ओठांना दुखापत करून घेतली. जर्सी चित्रपटातील माझी मजबूत आठवण असेल की, मला वाटले की, मी पुन्हा कधीही आधीसारखा दिसणार नाही.” त्याने पुढे खुलासा केला की, ही घटना तेव्हा झाली आहे, जेव्हा तो ऑफ कॅमेरा सराव करत होता. तसेच, हा तो दिवस होता, जेव्हा त्याने हेल्मेट परिधान न करण्याचा निर्णय घेतला होता.

दोन महिने थांबवावी लागली होती शूटिंग
आपल्या दुखापतीबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, “चेंडूने माझा खालचा ओठ फाडला होता. खरोखर यामुळे दोन महिन्यांसाठी शूटिंग थांबवावी लागली होती. मला जवळपास २५ टाके घालावे लागले. माझ्या ओठांना पूर्वपदावर येण्यासाठी खरोखर तीन महिने लागले. हेदेखील सामान्य वाटत नाहीये. माझ्या ओठांवर एक भाग आहे, जो मला वाटतो की, तो काम करत नाहीये. मी ते हलवू शकत नाही. मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिले आहे.”

शाहिद तेलुगू चित्रपट ‘जर्सी’च्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्ननूरी करत आहेत. हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबर, २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी शाहिद सन २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कबीर सिंग’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

-‘…त्यामुळेच मी एकटे झोपण्यासाठी घाबरायची’, अभिनेत्री ईशा गुप्ताही झाली होती ‘कास्टिंग काऊच’ची शिकार

हे देखील वाचा