Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड ईशा गुप्ताने शेअर केला बिकिनीमधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल

ईशा गुप्ताने शेअर केला बिकिनीमधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल

अनेकदा प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्याची फार आवड असते. कलाकार ही त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरून सतत काही ना काही शेअर करत असतात. कलाकारांना फेमस होण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया झाला आहे. अभिनेत्रींचे फोटोशूट सध्या चाहत्यांच्या मनोरंजन एक भाग बनला आहे. अनेक अभिनेत्री बोल्ड आणि हाॅट फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ताने बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.

प्रकाश झा दिग्दर्शित ‘एक बदनाम आश्रम’ या वेब सीरिजच्या सीझन 3 मध्ये ईशा (Esha Gupta)  शेवटची हुकुम सिंग (सचिन श्रॉफ) ची मैत्रीण आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड बिल्डिंग तज्ञ सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील तिचा बॉबी देओलसोबतचा इंटिमेट सीन खूप चर्चेत होता. यापूर्वी ईशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘REJCTX’ आणि ‘नकाब’ सारख्या वेब सीरिजमध्ये दिसली. सध्या ईशा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

ईशा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाववर शेअर करत असते. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. ईशाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचा नवीनतम फोटो शेअर करून चर्चेत आली आहे. 9 सप्टेंबरला शेअर केलेल्या फोटोमध्ये ईशा बिकिनीमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री लव्हेंडर रंगाच्या बिकिनी परिधान केली आहे. तिने मॅचिंग कलर कॅपसह तिचा बोल्ड लूक स्टाइल पूर्ण केली आहे.

कमी मेकअप आणि मोकळे केस असलेली ईशा गुप्ताची बिकिनी स्टाईल चाहत्यांची मने जिंकत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मानसिकदृष्ट्या मी येथे आहे.” ईशाचा हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 ईशा गुप्ता विषयी बोलायचं झाले तर, 36 वर्षीय ईशा गुप्ता एक मॉडेल आहे. तिने 2007 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मी स्टारर ‘जन्नत 2’ या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. (Actress Esha Gupta shared bikini photo)

अधिक वाचा-
‘जिनिलीया पुन्हा गरोदर आहे?’, रितेश आणि जिनिलीयाचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत
आहा कडकच ना! ‘जवान’मधील ‘तो’ सीन सुरू होताच थेट चित्रपटगृहात तरूणाने केले प्रेयसीला प्रपोज, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा