Monday, October 2, 2023

‘जिनिलीया पुन्हा गरोदर आहे?’, रितेश आणि जिनिलीयाचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

मराठी सिनेसृष्टील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. रितेश आणि जिनिलीया दोधेही मनोरंजन विश्वात सक्रिय असतात. गेल्यावर्षी त्यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. रितेश आणि जिनिलीयाच्या या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांंचे रेकाॅरेड तोडले आहे. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला. रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असतात. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या ते त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

रितेश (Riteish Deshmukh)आणि जिनिलीयाचा (Genelia Deshmukh) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी अनेक वेगवेगळ्या चर्चा सूरू केल्या आहेत. विरल भय्यानीने त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जिनिलीया हातात हात घालून कार्यक्रमासाठी गेलेले दिसत आहेत. यावेळी जिनिलीयाने जांभळ्या रंगाचा एक झकास वनपीस परिधान केला आहे. तिच्या या वनपिसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

त्यावेळी रितेशने पाढंंऱ्या रंगाच शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की जिनिलीया गरदोर आहे. तिच्या बेबी बंपने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी जिनिलीया आई होणार आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर एक युजरने कमेंट करताना लिहिले की, “जिनिलीया पुन्हा गरोदर आहे.” दुसऱ्याने लिहिले की,”ही तिसऱ्यांदा गरोदर आहे?” अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रितेश आणि जिनिलीयाच्या कामाविषयी बोलायचं झाले तर, रितेश देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेडच लावले. या सिनेमातील रितेश आणि जिनिलियाचा अभिनय, संगीत, गाणी सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.(Video of Riteish Deshmukh and Genelia Deshmukh went viral on social media)

अधिक वाचा-
‘सुभेदार’ चित्रपट पाहतच समीर वानखेडे यांनी केली पोस्ट शेअर; म्हणाले, ‘प्रत्येक भारतीयांचे…’
किरण मानेंनी शाहरुख खानसाठी शेअर केलेली पोस्ट व्हायरल; म्हणाले, ‘भावा तुझा स्पर्श…’

हे देखील वाचा