Monday, January 13, 2025
Home बॉलीवूड ईशा गुप्ताने शेअर केला बेडरूममधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल; कमेंट्स वाचाच

ईशा गुप्ताने शेअर केला बेडरूममधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल; कमेंट्स वाचाच

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयासोबतच बोल्डनेसमुळेही चर्चेत असतात. सिनेमात जास्त सक्रिय नसल्या, तरीही या अभिनेत्री सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो तसेच व्हिडिओ पोस्ट करून माध्यमांचे लक्ष वेधतात. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे ईशा गुप्ता होय. ईशा गुप्ताच्या प्रत्येक लूकवर नेटकऱ्यांसोबतच चाहतेही फिदा होतात. कधी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचा बिकिनी लूक शेअर करते, तर कधी भारतीय वेशभूषा साकारून प्रेक्षकांच्या भुवया उंचावते. यावेळी अभिनेत्रीने बेडरूममधील फोटो शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची सुपरहॉट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिचा बेडरूम सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड लूक्स देत आहे. अभिनेत्रीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच खळबळ माजली आहे. फोटोत ईशाचे लूक्स पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. काही चाहत्यांनी तिच्या लूक्सची प्रशंसाही केली आहे.

बोल्ड अवतारात अभिनेत्रीने वाढवले तापमान
या फोटोत ईशा गुप्ता बेडवर बसल्याचे दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा डीपनेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तसेच, तिने अशी काही पोझ दिली आहे, जे पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये फक्त एक इमोजी वापरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशाच्या या फोटोवर 5 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, 4 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “जीवापेक्षा जास्त आवडतेस.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आग लावून टाकलीस तू बेबी.”

यापूर्वी ईशाने फोनची टॉर्च लावून बोल्ड व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओत ईशाने रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. तसेच, फोनची टॉर्च लावून आरशासमोर विचित्र हावभावही केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

अभिनेत्रीच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘आश्रम 3’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिने ‘बाबा निराला’सोबत असे काही सीन्स दिले होते, ज्याची एकच चर्चा रंगली होती. (actress esha gupta wear spaghetti flaunts deep neck in bedroom photo viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कातिलाना अंदाज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बिकिनी घालून समुद्रकिनारी लचकवली कंबर, बोल्ड व्हिडिओ करेल घायाळ
दीपिका शेर, तर किली पॉलची बहीण सव्वाशेर! ‘बेशरम रंग’ गाण्यावरील नीमाच्या डान्सची नेटकऱ्यांनाही भुरळ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा