Friday, April 19, 2024

दीपिका शेर, तर किली पॉलची बहीण सव्वाशेर! ‘बेशरम रंग’ गाण्यावरील नीमाच्या डान्सची नेटकऱ्यांनाही भुरळ

हल्ली देशाच्याच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया स्टार उदयास येताना पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यातील खूप कमी जणांना प्रसिद्धी मिळते. त्यापैकीच एक आहे टांझानियाचा किली पॉल. किली हा नेहमीच बॉलिवूड गाण्यांवर लिपसिंक किंवा डान्स करताना दिसतो. त्याच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो. यामध्ये त्याची बहीण नीमा पॉल हीदेखील त्याच्यासोबत लिपसिंक किंवा डान्स करताना दिसते. अशात तिचा एक डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये ती ‘पठाण‘ सिनेमातील ‘बेशरम रंग‘ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

नीमा पॉलने बेशरम रंग गाण्यावर डान्स केला
किली पॉल (Kili Paul) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याची बहीण नीमा पॉल (Neema Paul) ही ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. यामध्ये तिने दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्या स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात ती काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत किलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तिने तिचे सर्वोत्तम देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

युजर्सने केला प्रेमाचा वर्षाव
किली पॉल आणि नीमा पॉल यांच्या या व्हिडिओला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच, हा व्हिडिओ जोरदार शेअर केला जात आहे. एकाने लिहिले की, “तू तर दीपिका पदुकोणपेक्षाही भारी डान्स केला आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.” याव्यतिरिक्त अनेकांनी किली आणि नीमा यांच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. खरं तर, हे दोघेही टांझानियातील आहेत. दोघांनी बॉलिवूड गाण्यांवर लिंपसिंक आणि डान्स व्हिडिओ करत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘पठाण’ कधी होणार रिलीज?
शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिकाचा ‘पठाण’ हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख आणि दीपिकाव्यतिरिक्त जॉन अब्राहम हादेखील मुख्य भूमिकेत असेल. तो यामध्ये खलनायकाचे पात्र साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. (kili paul sister neema paul dance on shahrukh khan deepika padukone pathaan song besharam rang see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमानने एक्स गर्लफ्रेंडसाेबत केले ‘हे’ विस्मयकारक कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच
तुनिषा आत्म’हत्या प्रकरणाला वेगळे वळण; अभिनेत्रीचे काका म्हणाले, ‘100 टक्के लव्ह जिहाद…’

हे देखील वाचा