Friday, July 5, 2024

तुझ्याकडे गाडी नाहीये का? गौतमीने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, थेट म्हणाली…

मनोरंजन विश्वात अनेक बहिणींच्या जोड्या कार्यकत आहेत. त्यातील एक फेमस जोडा म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे. गौतमी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. गौतमी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते. त्यावेळी चाहते तिचे कौतुक करत असतात. तर कधी तिला ट्रोल केले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकताच सोशल मीडियावर तुलना करणाऱ्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

गौतमीने (Gautami Deshpande) तिच्या मोठ्या बहिणी, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसोबतच्या तुलनेवर संताप व्यक्त केला आहे. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने एक प्रश्न उत्तरांच सेशन घेतला. गौतमी रिक्षेतून कुठेतरी बाहेर जात होती. तिने तिच्या चाहत्यांना विचारले की, ती कुठे जात आहे? गौतमीच्या या प्रश्नावर तिच्या चाहत्यांनी विविध उत्तरं दिली.

या दरम्यान एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ किती सुंदर आणि कर्तुत्ववान आहे.” या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर गौतमीनेही तिच्या शैलीत उत्तर देत त्याला गप्प केलं. प्रतिक्रिया इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिने लिहिलं, “मला अशी लोकं आवडतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, माझ्याकडे चांगली गाडी आहे. पण मुंबईत असल्यावर बऱ्याचदा मेट्रोतून प्रवास करणं सोयीस्कर असतं. माझ्या गाडीपेक्षा मला माझा वेळ जास्त मौल्यवान आहे. मला आशा आहे की, तुम्ही मोठे व्हाल आणि कर्तुत्ववान व्हाल.”

गौतमीच्या या उत्तराने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी गौतमीच्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं आहे. गौतमीने यावेळी तुलना करणाऱ्या नेटकऱ्याला प्रत्युत्तर देत त्यांना शिकवण दिली आहे. तिने सांगितलं आहे की, गाडी असणं किंवा नसणो ही एक महत्त्वाची गोष्ट नाही. महत्त्वाचं आहे की, वेळ कसा वापरावा. गौतमीच्या या उत्तराने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. (Actress Gautami Deshpande Responds To Mrunmayi Deshpande Trolling On Sister Mrunmayi Deshpande)

आधिक वाचा-
लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस
मालतीच्या जन्मानंतर प्रियांका चोप्रा झाली होती ‘कमकुवत’, अभिनेत्रीने सांगितली आव्हाने

हे देखील वाचा