अश्लील व्हिडिओ शूट करुन वेबसाइटवर अपलोड केल्याबद्दल अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक करण्यात आले होते. आता पुन्हा तिचे नाव दुसर्या एका प्रकरणात समोर आले आहे. गहना वशिष्ठ आणि इतर 3 जणांवर एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर गहना आणि त्या 3 लोकांवर महिलेला चुकीच्या पद्धतीने कैद केल्याचाही आरोप आहे.
अश्लील व्हिडिओसाठी 3 पुरुषांसह लैंगिक क्रिया करण्यास भाग पाडले, असा खुलासा एका 24 वर्षीय मॉडेलने केला आहे. शनिवारी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने गहना वशिष्ठला अश्लील व्हिडिओ शूटिंग आणि अपलोड करण्यासाठी अटक केली होती. गहनावर अश्लील व्हिडिओ शूट करून ते वेबसाइटवर अपलोड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी उमेश कामत यालाही अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या एमडीवरही त्यात सहभागी असल्याचा आरोप होता. मात्र, कुंद्राच्या टीमने म्हटले आहे की, यात कुंद्राचा समावेश नाही. यासाठी कंपनीच्या एमडीला दोष देण्यात येत आहे.
दुसरीकडे, सागरिका शोना सुमन नावाच्या मॉडेलने राज कुंद्रावर खळबळजनक आरोप केले आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली आहे. राज कुंद्रा हे या रॅकेटचा एक भाग असून त्यांना अटक केली पाहिजे, असे सागरिका म्हणाली.
ती म्हणाली की, “जितके पॉर्न साईटचे मालक आहेत आणि जितक्या या प्रकारच्या गोष्टी चालू आहेत, त्या सर्व बंद झाल्या पाहिजे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गहना वशिष्ठच्या प्रकरणात आता राज कुंद्राचेही नाव समोर आले आहे. त्यांना शक्य तितक्या लवकर अटक करण्यात यावी, असे मला वाटते. कारण यामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य खराब होत आहे.”
तसेच, गहना वशिष्ठ कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि 14 दिवसांनंतर या प्रकरणातील चौकशी पुढे जाईल. दुसरीकडे, गहनाच्या टीमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. गेहनाच्या टीमने निवेदनात म्हटले आहे की, “तिला (गहनाला) एका वर्षात चार वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. तिला अस्थमा देखील आहे आणि तिची तब्येत अत्यंत नाजूक आहे. मुंबई पोलिसांनी तिच्याशी मानवतेच्या भावनेने वर्तणुक करावी. ती गुन्हेगार नाही. या अश्लील वेबसाईट्सचा तिच्याशी काहीही संबंध नाही.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ