Monday, July 1, 2024

माेठी बातमी! दाेन वेळा ऑस्करच्या विजेत्या ठरलेल्या अभिनेत्रीचे निधन, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

ब्रिटनच्या राजकारणी आणि दोन वेळा ऑस्कर विजेती ग्लेंडा जॅक्सन यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोनदा अकादमी पुरस्कार जिंकला आहे. जॅक्सन या एक उत्तम अभिनेत्री मानल्या जायच्या. याशिवाय त्यांनी राजकारणातही चांगले नाव कमावले होते. अशात त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे.

ग्लेंडा जॅक्सन (glenda jackson) या 1960 आणि 70च्या दशकातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. या काळात त्यांना दोनदा अकादमी पुरस्कारही मिळाला. ‘वूमन इन लव्ह’ आणि ‘ए टच ऑफ क्लास’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दिग्गज अभिनेत्रीने लेबर पार्टीच्या वतीने 23 वर्षे राजकारणात घालवली आणि खासदार म्हणून निवडूनही आल्या.

यानंतर ग्लेंडा जॅक्सनने राजकारणातून निवृत्ती घेतली आणि पुन्हा अभिनयाच्या दिशेने पाऊल टाकले. यावेळी त्यांनी एकापेक्षा जास्त भूमिका केल्या. अशात ग्लेंडा जॅक्सन यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

ग्लेंडा जॅक्सन ह्या त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक व्यवसाय करत असत. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबतही काम केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक सुपरहिट दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे. राजकारणी म्हणूनही त्यांचे काम ब्रिटनमधील लोकांना खूप आवडले होते. यामुळे अनेकवेळा निवडणुका जिंकून त्या ब्रिटनच्या संसदेत पोहोचल्या. (actress glenda jackson death at the age of 87 )

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल 
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची अनुपमाला पडली भुरळ, ‘गुरु माँ’साेबत दिसली ठुमके लावताना

हे देखील वाचा