Saturday, July 6, 2024

‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीची इंडियन आयडलच्या मंचावर ‘अदाकारी’, प्रेक्षकांकडून नृत्याला भरभरून दाद

आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने लाखो चाहत्यांवर भुरळ पाडणारी ‘ड्रीम गर्ल’ म्हणजे हेमा मालिनी. 90 च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांवर जी जादू केली आहे, ती जादू आज ही प्रत्येकावर कायम आहे. ही सदाबहार अभिनेत्री आजही कित्येक अभिनेत्रींना प्रेरणा देते. सोशल मीडियावर तिची गाणी आणि चित्रपटातील काही प्रसिद्ध डायलॉग नेहमीच ट्रेंड होत असतात. हेमा मालिनी सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल’ या रिऍलिटी शोमध्ये येणार आहे. त्याच एपिसोडचा प्रोमो सोनी टीव्हीने नुकताच प्रदर्शित केला आहे. या शोमध्ये ती तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तिने जेव्हा या शोमध्ये एंट्री केली, तेव्हा ‘ड्रीम गर्ल’ या गाण्याने तिचे स्वागत झाले.

हेमा मालिनीच्या उपस्थितीत या शोमधील स्पर्धकांनी तिच्या सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली. सगळ्यात आकर्षणाची गोष्ट म्हणजे तिने या रंगमंचावर भरतनाट्यम केले आहे. ‘जब तक है जान, जाने जहा मैं नाचुंगी’ या सुपरहिट गाण्यावर तिने डान्स केला आहे. या गाण्यातील तिचा डान्स आणि अदाकारी पाहून खूपच लाईक्स आणि कमेंट मिळताना दिसत आहेत.

या शोमध्ये तिच्या मुलीचा एक व्हिडिओ देखील तिला दाखवला गेला आहे, ज्यात तिची मुलगी म्हणते की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अशी आई मिळाली.” तिच्या या वाक्याने सेटवरील सगळीच मंडळी भावूक झाली. नेहा आणि हेमा मालिनीचे तर डोळेच भरून आले.

याव्यतिरिक्त तिने तिच्या सुपरहिट चित्रपटातील डायलॉग म्हटले आहेत. त्यात तिने ‘चल धन्नो आज तेरी बसंती की इज्जत का सवाल हैं’, ‘जब तक है जान जाने जहा मैं नाचुंगी’ हे डायलॉग सगळ्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातर म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

-‘सीरियल किसर’ इमरान हाशमीच्या ‘या’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री मोनालिसा, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

-‘फ्लाय’ गाण्यातून पहिल्यांदाच आली बादशाह-शेहनाजची केमेस्ट्री चाहत्यांसमोर, पाहा युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गाणं

हे देखील वाचा