Wednesday, July 3, 2024

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानने केले अतरंगी फोटोशूट, चक्क कपाटात दिल्या पोझ!

टेलिव्हिजन मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. जी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दुसरीकडे, हिना अनेकदा तिच्या स्टाईल सेन्समुळे चर्चेत असते. बिग बॉसचे घर असो किंवा हॉट फोटोशूट, चाहत्यांना कसे आकर्षित करायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे. यावेळी हिना तिच्या खास फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

हिनाने तिचे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटो पाहून हिनाने फोटोशूटसाठी खूप मेहनत घेतल्याचे स्पष्ट होते. हे फोटोशूट तिने कपाटात बसून केले आहे. कधी ती कपाटाला लटकलेली दिसत आहे, तर कधी ती चिकटलेली दिसत आहे. या फोटोशूटमध्ये हिनाने हिरव्या रंगाचा टाइट वन-पीस ड्रेस परिधान केला आहे. ज्यासोबत तिने मॅचिंग पिवळ्या रंगाचे हाय हिल्स बेली शूज घातले आहेत. हिना मोठ्या कपाटात वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना हिनाने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेड्यांशी व्यवहार करताना, स्मार्ट असल्याचे ढोंग करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.” तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते सतत कमेंट्स करत आहेत. त्यासह तिच्या या फोटोंना आत्तापर्यंत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नुकतेच हिना खानने मास्क काढून सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि कुटुंबातील प्रत्येकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तिच्या चेहऱ्यावर गडद लाल खुणा असल्याने तिचे हे फोटो पाहून चाहते हैराण झाले. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये सांगितले होते की, तिच्याशिवाय तिच्या कुटुंबातील प्रत्येकजण कोव्हिड पॉझिटिव्ह आहे आणि ती सतत मास्क घालून सर्वांची काळजी घेत आहे. तसेच २४ तास ७ दिवस घराची स्वच्छता करणे. पोस्टमध्ये, हिनाने सांगितले की, तिच्या सतत मास्क परिधान केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर लाल खुणा आल्या आहेत.

हे देखील वाचा