Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘सगळा पैसा मी कमावलेला’, मनी लाँड्रिंग प्रकरणावर जॅकलिनची मोठी प्रतिक्रिया

‘सगळा पैसा मी कमावलेला’, मनी लाँड्रिंग प्रकरणावर जॅकलिनची मोठी प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. जॅकलिन हिचा ७.२७ कोटी रुपयांचा निधी पीएमएलएकडून गुन्ह्यातील कमाई समजून जप्त करण्यात आला. मंगळवारी (दि. २३ ऑगस्ट) जॅकलिनने या प्रकरणी पीएमएलएच्या न्यायनिवाडा अधिकार्‍यांना तिचे मत नोंदवले आहे.  अभिनेत्रीने यावेळी स्पष्ट केले की, तिच्या पैशांचा कोणत्याही गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.

अभिनेत्रीने नोंदवले मत
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही मागील बऱ्याच काळापासून मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. यादरम्यान अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून नुकतेच दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्येही अभिनेत्रीच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. याअंतर्गत जॅकलिनच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान, जॅकलिनने तिच्या ७.२७ कोटी रुपयांच्या निधीशी संबंधित प्रकरणाबाबत पीएमएलएच्या न्यायनिवाडा अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे नोंदवले आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटनुसार, जॅकलिनने सांगितले की, “माझ्या मुदत ठेवीचा कोणत्याही गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. माझ्याकडे असलेल्या सर्व ठेवी वैध आहेत, ज्या माझ्याकडे बऱ्याच काळापासून आहेत.” तिने पुढे सांगितले की, ही मुदत ठेव तिच्याकडे तेव्हापासून आहे, जेव्हापासून ती या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरला ओळखत नव्हती.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलीये जॅकलिन
खरं तर, मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. माध्यमांतील वृत्तांमध्ये असे सांगण्यात आले होते की, जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, नंतर अभिनेत्रीने हे खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, ईडीने प्रकरणाचा तपास केल्यानंतर समजले होते की, सुकेश हा २१५ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी आहे. सोबतच त्याने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, त्यामुळे तीदेखील ईडीच्या निशाण्यावर आली होती.

जॅकलिनच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विक्रांत रोना’ या सिनेमात दिसली होती. आता तिच्या खात्यात ‘सर्कस’, ‘रामसेतू’, ‘किक २’, ‘हाऊसफुल ५’ या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दोन वर्षांपासून ठप्प पडलेल्या कमल हासन यांच्या सिनेमाचा मार्ग मोकळा, सर्वत्र झळकतंय नवीन पोस्टर
करीना-आलियानंतर आता करण जोहरनेही ट्रोलर्सवर केली आगपाखड; म्हणाला, ‘अरे तुम्हाला आवडत नाही ना, मग…’
‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी

हे देखील वाचा