Wednesday, March 29, 2023

दोन वर्षांपासून ठप्प पडलेल्या कमल हासन यांच्या सिनेमाचा मार्ग मोकळा, सर्वत्र झळकतंय नवीन पोस्टर

दोन महिन्यांपूर्वी अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. हा सिनेमा तमिळ इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला होता. अशात साऊथ आणि बॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या कमल हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या पेंडिंग सिनेमाची शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत होते. दोन वर्षांपूर्वी ‘इंडियन २’च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर सिनेमाचे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर या सिनेमाबद्दल वेगवेगळे वृत्त समोर आले होते. मात्र, पुन्हा एकदा कमल हे त्यांच्या सिनेमासोबत परतण्यासाठी तयार आहेत.

कमल हासन (Kamal Haasan) हे त्यांच्या ‘इंडियन २’ (Indian 2) या आगामी सिनेमाच्या लूकमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अशात त्यांचा सिनेमातून नवीन लूक (Kamal Haasan New Look) समोर आला आहे, यामध्ये त्यांना म्हाताऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत एखाद्या राजकारण्यासारखे दिसत आहेत. यामध्ये ते पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि गमछा घेत डॅशिंग अंदाजात दिसत आहेत. त्यांचा हा लूक खूप व्हायरल होत आहे. कमल यांचा हा लूक जोरदार व्हायरल होतोय. त्यांचा लूक पाहून चाहते त्यांचा सिनेमा पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक झाले आहेत.

सिनेमाच्या या पोस्टरमध्ये कमल हासन यांना ओळखणे त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच कठीण होत आहे. चित्रपट निर्माते शंकर यांनी ट्वीट करत लिहिले आहेत की, “आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, इंडियन २ सिनेमाची पेंडिंग शूटिंग आजपासून सुरू होत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची आणि शुभेच्छांची गरज आहे.”

सिनेमाच्या सेटवर घडलेली दुर्दैवी घटना
खरं तर, २ वर्षांपूर्वी चेन्नईच्या सिनेमा सेटवर घडलेल्या घटनेत सहाय्यक दिग्दर्शकासह ३ व्यक्तींचे निधन झाले होते. तसेच, १० लोकांना दुखापत झाली होती. या सिनेमाला खूप वेळ लागण्यामागील एक कारण म्हणजे कोव्हिड १९ होय. तसेच, दुसरे कारण रिपोर्टनुसार, प्रॉडक्शन हाऊस आणि शंकर यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात आहे.

सिनेमातील कास्टबद्दल बोलायचं झालं, तर या सिनेमात काजल अगरवाल आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे, ‘इंडियन २’ हा सिनेमा १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या सिनेमाचा दुसरा भाग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
करीना-आलियानंतर आता करण जोहरनेही ट्रोलर्सवर केली आगपाखड; म्हणाला, ‘अरे तुम्हाला आवडत नाही ना, मग…’
‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी
दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’

हे देखील वाचा