Wednesday, March 29, 2023

करीना-आलियानंतर आता करण जोहरनेही ट्रोलर्सवर केली आगपाखड; म्हणाला, ‘अरे तुम्हाला आवडत नाही ना, मग…’

सध्या एकाच विषयाबद्दल जास्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणजे, बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड होय. बॉलिवूडचे अधिकतर सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर तुफान फ्लॉप होतायेत. असे असले, तरीही सिनेमे फ्लॉप होण्यामागे खूप काही कारणे आहेत. दुसरीकडे, करण जोहर याचा प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो ‘कॉफी विथ करण‘ हा देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. करण त्याच्या या शोमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो कलाकारांना शोमध्ये असे काही प्रश्न विचारतो, ज्यामुळे शो चर्चेचा विषय ठरतो. अशात सतत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल करणने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

करण जोहर (Karan Johar) याने नुकत्याच दिलेल्या त्याच्या मुलाखतीत ट्रोलिंगबद्दल वक्तव्य केले. तो म्हणाला की, “माहिती नाही लोक शोचा एवढा तिरस्कार का करतात. हे खरंय की, अशाप्रकारचा आणखी एक शो आहे, पण या शोला खूप ट्रोल केले जात आहे. मी सगळ्या कमेंट्स पाहिल्या नाहीत. मात्र, मी नेहमी असेच म्हटले आहे की, हा शो इतका चांगला आहे, जितका आमच्या काऊचवर बसलेला पाहुणा.”

करणने असेही म्हटले की, “मला कधीकधी ट्रोलिंग खूपच आश्चर्यकारक वाटते. माहिती नाही, लोकांना या शोचा इतका त्रास का होतो, आणि शिवाय ते पाहतही आहेत. मी पोर्टल्सवरील बातम्या वाचल्यात की, लोक त्यांच्या आयुष्यातील एवढा वेळ खर्च करून त्या गोष्टीवर मोठमोठ्या बातम्या लिहीत आहेत, ज्या त्यांना आवडत नाहीत.”

खरं तर, करणपूर्वी करीना कपूर आणि आलिया भट्ट यांनी बॉयकॉट ट्रेंडवर सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आता करणच्या या वक्तव्याचा त्याच्या शोवर काही परिणाम होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

‘कॉफी विथ करण’ या शोमधील आठवा एपिसोड बुधवारी (दि. २४ ऑगस्ट) १२ वाजता प्रसारित केला जाणार आहे. या शोमध्ये शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी हे कलाकार पाहुणे म्हणून उपस्थित असतील. यादरम्यान कियारा शाहिदबद्दल मोठा खुलासा करतानाही दिसणार आहे. तो असा की, ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या सेटवर शाहिदने तब्बल ८ कियाराला वाट पाहायला भाग पाडले होते. त्यानंतर ती खूपच चिडल्याचे तिने या शोमध्ये सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी
दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम

हे देखील वाचा