बोल्ड आणि ब्युटीफुल! जॅकलिनच्या टाॅपलेस फोटोचा सोशलवर राडा; काही मिनिटात लाखो लाईक्स

Actress Jacqueline Fernandez Poses Topless In New Photo Viral On Internet


बॉलिवूड कलाकार म्हटलं की, त्यात बोल्डनेस, हॉटनेस, ग्लॅमरस या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आपल्या हटके अदा चाहत्यांसाठी शेअर करताना दिसतात म्हणजे दिसतातच. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘जॅकलिन फर्नांडिस’ होय. जॅकलिनच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपण गेलोय आणि तिथे आपल्याला हॉट, ग्लॅमरस फोटो दिसणार नाहीत, असं कधीच होणार नाही. ती नेहमीच कधी बीचवर बिकिनी घातलेले फोटो, तर कधी चाहत्यांना घायाळ करतील असे हॉट फोटो शेअर करत असते. आता तिने आपला असाच एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहूून चाहत्यांसोबतच अभिनेतेही फिदा झाले आहेत. हा फोटो इंटरनेटवर नुसता राडा करत असून जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री जॅकलिनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये ‘वावा’ असं लिहिलंय.

तिचा हा फोटो पाहून चाहते तर सोडाच, प्रसिद्ध होस्ट, टीव्ही अँकर आणि अभिनेता मनीष पॉलही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही.

तिची प्रसिद्धी यावरूनच समजते की, तिने फोटो पोस्ट करताच काहीच मिनिटांत फोटोला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले होते. आतापर्यंत या फोटोने १६ लाख लाईक्सचाही टप्पा ओलांडला आहे.

जॅकलिनने नुकतेच आपला बहुप्रतिक्षित ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यादरम्यानचा फोटो शेअर करत तिने निर्माते, सहकलाकार आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिला. तिने लिहिले की, ‘ही भूमिका साकारताना खूप मजा केली होती.’ यासह तिने #BachchanPandey असा हॅशटॅगही दिलाय.

‘बच्चन पांडे’ या चित्रपटामध्ये जॅकलिनव्यतिरिक्त सुपरस्टार अक्षय कुमार आणि हॉट अभिनेत्री क्रिती सेनन हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी, २०२२ रोजी रिलीझ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

याव्यतिरिक्त जॅकलिनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘अटॅक’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट, २०२१ रोजी रिलीझ होणार आहे. या चित्रपटात दमदार अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंगही झळकणार आहेत.

जॅकलिन ‘भाईजान’ सलमान खानसोबत ‘किक २’ मध्येही दिसणार आहे. सोबतच ‘भूत पोलीस’ या चित्रपटातही ती काम करणार आहे.

तिने सन २००९ मध्ये ‘अलादिन’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जान्हवीच्या मॅनेजरने केला चाहत्यासोबत गैरव्यवहार; पाहून जान्हवीने केले असे काही, व्हिडिओ व्हायरल

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.