‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ

Radhe Poster Actor Salman Khan Fulfills Promise About Film Radhe This Gift To Fans


बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सलमानने आपल्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीझ करत चाहत्यांना भेट दिली आहे. त्यामुळे त्याचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. हा सिनेमा यावर्षी ईदला म्हणजेच १३ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीझ होणार आहे.

सलमानने आपल्या भन्नाट अंदाजात सिनेमाचे पोस्टर रिलीझ केले आहे. त्याने पोस्टर रिलीझ करत “ईदचे वचन दिले होते, ईदलाच येऊ कारण एकदा का मी..,” असे म्हटले आहे.

‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. या सिनेमात सलमान खानव्यतिरिक्त दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान फिल्म्स, रील लाईफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.