सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

bold actress sai tamhankar looks stunning in latest photos bhojpuri south ditish


‘हंटर’ चित्रपटात दिसलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बर्‍याचदा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वत:चे फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने पोस्ट केलेल्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळत आहे.

फोटोमध्ये सई एका हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यात ती हटके अंदाजात पोज देताना दिसत आहे. कमी मेकअपमध्येही ती चाहत्यांना आकर्षित करत आहे.

सई ताम्हणकर हे मराठी चित्रपटांमधील परिचित नाव आहे. मराठीनंतर तिने हिंदी चित्रपटातही आपला ठसा उमटवला आहे. लवकरच ती क्रिती सेनन आणि पंकज त्रिपाठीसमवेत ‘मीमी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे.

यासोबतच, सई लवकरच प्रकाश कुंटे यांच्या रोमँटिक ड्रामा ‘कलरफूल’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘मीडियम स्पायसी’ मध्येही दिसणार आहे. ज्यात ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

मल्टि टॅलेंटेड अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘हंटर’, ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत तिची ओळख निर्माण केली आहे. यांनंतर आता तिने फॅशन लेबलही लाँच केले आहे. अलीकडेच तिने ‘द साडी स्टोरी’ हे फॅशन लेबल बाजारात आणले आहे.

सांगलीत जन्मलेली सई ताम्हणकर राज्यस्तरीय कबड्डीपटू व एक चांगली कराटे खेळाडू आहे. ती अनेक आंतर- महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, तिथूनच ती अभिनयाच्या युक्त्या शिकली. ‘आधे अधुरे’ या नाटकासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

या व्यतिरिक्त सई तिच्या आगामी चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतील अशी तिला आशा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिया खलिफाचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनोखे फोटोशूट, पाहून तुम्हीही म्हणाल ‘ओह माय गॉड!’

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने लावले ‘सैंया जी’ गाण्यावर ठुमके, स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ

-‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंगला विचारला असा प्रश्न की भडकली अभिनेत्री, चिडलेल्या अंदाजावर चाहते फिदा; व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.