Friday, June 5, 2026
Home बॉलीवूड जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला तिचा दिवाळी लूक, केसात माळलेल्या गुलाबावर खिळल्या लाखो नजरा!

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला तिचा दिवाळी लूक, केसात माळलेल्या गुलाबावर खिळल्या लाखो नजरा!

सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होताना दिसत आहे. कलाकार देखील त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियावर त्याच्या घरातील दिवाळीचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी कलाकारांसोबत बॉलिवूड कलाकार देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच जॅकलिन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर तिचे पारंपारिक वेशातील फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॅकलिनने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, जॅकलिन अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यासोबत तिने लाल रंगाचा प्लेन फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज घातला आहे. तसेच कानात छोटेसे ईअरिंग घातले आहेत. तिच्या या लूकमधील खास आकर्षण म्हणजे तिने केसात माळलेली गुलाबाची फुले. त्यामुळे तिचा लूक आणखीनच रेखीव दिसत आहे. (Actress Jacqueline Fernandez share her diwali look on social media and give best wishes of diwali)

हे फोटो शेअर करून तिने “सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. अनेकजण तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तर अनेकजण तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘जुडवा २’, ‘किक’, ‘रेस ३’, ‘हाऊसफुल ३’, ‘डिशुम’, ‘अ फ्लाईंग जॅट’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. या सोबत ती लवकरच ‘किक २’, ‘भूत पोलीस’, ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.तसेच जॅकलिन तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटातील डान्सचे नेहमीच खूप कौतुक होत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मनिके मागे हिते’ गाण्याची गायिका योहानीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने लगावले जोरदार ठुमके

-‘अगं तुझा ड्रेस फाटलाय!’ जॅकलिन फर्नांडिसने सेल्फी शेअर करताच, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

-काय सांगता! नोरा अन् जॅकलिनला ‘या’ व्यक्तीने केली होती लक्झरी कार गिफ्ट, दोन बंगलेही…

हे देखील वाचा