साल १९२७ साली बंगालमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध गायक शंकर दासगुप्ता (Shankar Dasgupta) यांनी लहानपणापासूनच गाणे गायला सुरू केले होते. ते प्रशिक्षित गायक होते. १९४६ मध्ये त्यांना अनिल बिस्वाससोबत ‘मिलन-४६’ या चित्रपटातून ब्रेक मिळाला. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच शंकर दासगुप्ता यांनी त्यांचे पहिले गाणे गायले, जे खूप लोकप्रिय झाले. या गाण्याच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ते बंगाली भाषिक गायकांपैकी एक होते, ज्यांचा आवाज आणि गाणी सर्वांनाच आवडायची. त्यांच्या गाण्यांचेही सर्वांनी खूप कौतुक केले. रविवारी (२३ जानेवारी) शंकर दासगुप्ता यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ त्यांचाबद्दल खास माहिती…
‘मिलन ४६’ नंतर त्यांनी ‘अंजना’, ‘दीदी’, ‘गर्ल्स स्कूल’, ‘जीत’, ‘आहुती,’ ‘इज्जत’, ‘दो राह’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यांनी ३९ चित्रपटांमध्ये सुमारे ६३ गाणी गायली आहेत. चित्रपटात गाणी गाण्यासोबतच शंकर दासगुप्ता यांनी नंतर चित्रपटांना संगीत द्यायलाही सुरुवात केली. आपल्या संगीत कारकिर्दीत त्यांनी ४ चित्रपटांना संगीत दिले. ‘सदमा’, ‘शीश की दीवार’, ‘हॉटेल’ आणि ‘पहली मुलाकात’ अशी या चार चित्रपटांची नावे होती. त्याचं काम प्रेक्षकांनाही आवडलं होतं.
वृत्तवाहिनीमध्येही केलं काम
त्यांनी संगीतकार अनिल बि स्वास आणि संगीतकार जयदेव यांना त्यांच्या संगीत कार्यात अनेक वर्षे मदत केली. संगीतासोबतच त्यांनी टीव्ही आणि वृत्तवाहिन्यांवरही काम केले. ते टीव्ही आणि न्यूजमध्ये ‘रिव्ह्यू’ म्हणून काम करायचे. नोकरीतून निवृत्त झाल्यावर, त्यांनी भारत सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, पण त्यांनी इंग्लंडमध्येही काम करणे सोडले नाही. तिथेही शंकर दासगुप्ता टीव्हीवर काम करत होते.
भारतात शेवटचा प्रवास
भारतातून इंग्लंडला जाऊनही शंकर दासगुप्ता अनेकदा भारतात यायचे. १९९२ मध्येही ते भारतात आले होते. पण हा भारताचा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. २३ जानेवारी, १९९२ मध्ये मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात शंकर दासगुप्ता जागीच मरण पावले.
हेही वाचा :
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान