Monday, July 15, 2024

Shocking: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा! २६ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या

हॉलिवूड जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रेजिना किंगचा (Regina King) एकुलता एक मुलगा इयान अलेक्झांडर ज्युनियर (Ian Alexander Jr.) याने, वयाच्या २६व्या वर्षी आत्महत्या केली आहे. या बातमीमुळे संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

गेल्या बुधवारीच (१९ जानेवारी) अलेक्झांडरने त्याचा २६ वा वाढदिवस साजरा केला होता. हा काळ त्याच्या कुटुंबासाठी विशेषतः रेजिना किंगसाठी चकित करणारा आणि खूप भयावह आहे. त्यांच्या प्रवक्त्याने चाहत्यांसमोर येऊन सांगितले की, या घटनेनंतर त्यांचे कुटुंब पूर्णपणे तुटले आहे. हे सर्व का आणि कसे घडले, हे त्यांना अजूनही समजू शकलेले नाही. अनेक मोठ्या हॉलिवूड सेलिब्रिटींनी इयानच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केला आहे आणि त्यांनी या कठीण काळात रेजिनासाठी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. (oscar winning director regina king son ian alexander commits suicide was only 26 years old)

रेजिनाने स्वतः केली मुलाच्या मृत्यूची पुष्टी
रेजिनाने लोकांना दिलेल्या निवेदनात इयानच्या मृत्यूची पुष्टी केली. तिने त्या निवेदनात म्हटले आहे की, तो एका लखलखत्या प्रकाशासारखा होता, ज्याने नेहमी इतरांच्या आनंदाची काळजी घेतली. या वाईट वेळी एकटे सोडण्याबद्दलही रेजिना बोलली. तिने सांगितले की, “आमच्या कुटुंबाची इच्छा आहे की, आम्हाला या खासगी काळात सन्मानाने जगू द्यावे.”

बुधवारीच इयानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक विचित्र चिंतावाली पोस्ट केली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे मानसिक कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेजिनाच्या एकुलत्या एक मुलाने वयाच्या २६व्या वर्षी असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. रेजिना हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. तिला प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. अशातच तिच्या मुलाच्या निधनावर चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. जेनेट जॅक्सनने इंस्टाग्रामवर लिहिले की, “इयानबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. कृपया लक्षात असुद्या की मी तुमच्यासाठी येथे आहे.” त्याचप्रमाणे, इतर अनेक सेलिब्रिटींनी या कठीण काळात रेजिनाला प्रोत्साहन दिले. या दु:खाच्या काळात रेजिना स्वतःला एकटी ठेवत आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

हे देखील वाचा