Wednesday, July 3, 2024

पॅपराझींना बघून जया बच्चन यांचा राग अनावर; चाहते म्हणाले, ‘अशांना बाॅयकाॅट करायला पाहिजे’

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांचा राग सर्वांनाच माहीत आहे. चित्रपटसृष्टीला उत्तमोत्तम चित्रपट देणाऱ्या जया यांचा मूड आजकाल चाहत्यांना आणि पॅपराझींना पाहूनच बिघडतो. अलीकडे, त्या त्यांच्या स्वभावामुळे फारच चर्चेत राहतात. अशातच पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओ द्वारे यूजर्स जया बच्चन यांना प्रचंड ट्राेल करत आहे.

अभिनेत्री जया बच्चन (jaya bachchan) आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा (navya naveli nanda) हिने नुकतेच मुंबईत एका फॅशन वीक फंक्शनला हजेरी लावली. कार्यक्रमातून बाहेर पडताना मीडियाचे कॅमेरे जया बच्चन यांचे फोटो क्लिक करू लागले. हे सर्व पाहून त्या प्रचंड संतापल्या आणि तिच्या प्रोफेशनबद्दल प्रश्न विचारू लागल्या. त्याचे हे वागणे पाहून सोशल मीडिया यूजर्स जया बच्चना यांच्यावर फार संतापले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक फोटोग्राफर अचानक अडखळतो, ज्याला जया बच्चन म्हणतात, “मला आशा आहे की, तू दुप्पट वेगाने पडशील.” जया यांचा राग इथेच थांबत नाही. त्या पुढे एका पॅपराझींना त्यांच्या मीडिया हाउसचे नाव विचारतात आणि जेव्हा त्यांना मीडिया हाऊसचे नाव कळते, तेव्हा त्या म्हणतात हे कोणते वर्तमानपत्र आहे? मात्र, यावेळी नव्या आजीला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसली. पुन्हा एकदा जया याचे वागणे लोकांना आवडले नाही.

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “जेव्हा देवीला हे सर्व आवडत नाही, तर ती घराबाहेर का पडते?” तर एक यूजर कमेंट करुन मीडियावाल्यांना प्रश्न विचारू लागला की, “तुम्ही अशा लोकांना किंमत का देता?” एकाने तर चक्क कमेंट करत म्हंटले की, “तुम्ही त्यांच्यावर बहिष्कार का घालत नाही, नका काढत जाऊ त्यांचे फाेटाे.”

काही दिवसांपूर्वी, जया बच्चन ‘केबीसी’मध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान त्यांनी आणि अभिषेकने अमिताभ यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. जया बच्चन यांच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर त्या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार

…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!

हे देखील वाचा