Friday, February 3, 2023

दु:खद! एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे, हॉस्पिटलमध्ये आहे ऍडमिट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 1960 आणि 1970 च्या दशकात राज्य करणारी दिग्गज अभिनेत्री जयकुमारी या आजारपणाशी झुंज देत आहेत. जयकुमारी या चित्रपटांमधील ग्लॅमरस पात्रांसाठी ओळखल्या जात असे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्या आजारामुळे आर्थिक अडचणींना बळी पडल्या आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांना मदतीची मागणी केली आहे. 

जयकुमारी यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार
माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त असल्यानं त्यांनी उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. पैशांअभावी जयकुमारी यांची वाईट परिस्थिती असल्यानं त्यांना चेन्नईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकतेच तिमिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी अभिनेत्रीच्या उपचाराचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही, तर आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनीही रुग्णालयात जाऊन अभिनेत्रीची भेट घेतली. अभिनेत्री जयकुमारी यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

उपचारासाठी खर्च करण्यास मुलगा आहे असमर्थ
माध्यमांतील वृत्तांनुसार, जयकुमारी यांचे पती नागापट्टिनम अब्दुल्ला यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अभिनेत्रीला एक मुलगा आणि दोन मुली असून त्या मुलगा रोशनसोबत राहतात. मात्र, उपचारासाठी लाखोंचा खर्च येत असल्याने इतकी माेठी रक्कम देण्यास ताे असमर्थ आहे, त्यामुळे त्यांनी मदतीची मागणी केली होती.

जयकुमारी यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
जयकुमारीयांनी 1968 मध्ये मल्याळम चित्रपट ‘कलेक्टर मालथी’ मधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्यात ‘फुटबॉल चॅम्पियन’, ‘नटरुक्कू नूरू’, ‘मन्निना मागा’ यांसारख्या दमदार चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र, ‘एन्गिरिंदो वंदल’, ‘हरमाना’, ‘नटरुक्कू नुरू’, ‘अनाथाई आनंदन’ यासारख्या चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत…’, अक्षयबद्दल स्वराचे खळबळजनक वक्तव्य, पण असं का म्हणाली अभिनेत्री?
भोजपुरी क्वीन अक्षरा सिंहने सांगितले व्हायरल एमएमएसचे सत्य; म्हणाली,’मी रडणार नाही…’
अरेरे! फातिमा सना शेखने विकी कौशलसोबत केले असे काही, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा