Thursday, April 18, 2024

GoodNews! काजल अग्रवालच्या घरी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन, पण मुलगा की मुलगी?

सध्या मनोरंजन क्षेत्रात एकापाठोपाठ एक अभिनेत्री गुड न्यूज देताना दिसत आहेत. हिंदी चित्रपट जगतातील अभिनेत्री कॉमेडियन भारती सिंगने (Bharti Singh) मुलाला जन्म दिल्याची तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबीना बॅनर्जीनेही मुलीला जन्म दिल्याची बातमी चर्चेत असतानाच आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतूनही आनंदाची बातमी समोर आली आहे. ही गुड न्यूज अभिनेत्री काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) दिली असून नुकताच अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी समोर येताच काजलच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.

हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. काजल अग्रवाल आणि पती गौतम किचलु आई बाबा झाले असून, काजलने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या  गोड बातमीबद्दल तिचे चाहत्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. काजल आणि गौतमने २०२० मध्ये मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये लग्न केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने २०२२ मध्ये आपल्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिली होती. अनेकदा काजलने बेबी बंप फ्लॉंन्ट करतानाचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान अभिनेत्री काजल अग्रवालने हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेजगतात आपल्या दमदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयाचे आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या चित्रपटांइतकीच काजल सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरुन ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. काजलने ‘मगधीरा’, ‘सिंघम’, ‘सिता,’ ‘डार्लिंग’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा