Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड काजोलने जुन्या आणि लेटेस्ट लूकची केली तुलना, ‘अशी’ उडवली स्वतःचीच खिल्ली

काजोलने जुन्या आणि लेटेस्ट लूकची केली तुलना, ‘अशी’ उडवली स्वतःचीच खिल्ली

बॉलिवूड विश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे आणि त्यांच्या बोल्ड लूकसाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्याचप्रमाणे काजोल (Kajol) आणि अजय देवगणची (Ajay Devgan) मुलगी न्यासा देवगण तिच्या लेटेस्ट फोटोशूट आणि फॅशन शोमुळे खूप चर्चेत आहे. ती तिची आई काजोलसारखी दिसते, असे अनेकांचे म्हणणे आहे. मुलगी आता मोठी झाली असून करिअरला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली असली तरी काजोलची क्रेझ अजूनही कायम आहे. तिचे चाहते आजही तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. १९९० च्या दशकातील टॉप अभिनेत्री काजोलने पुन्हा एकदा तो काळ आठवला असून तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या दोन्ही लूक्सची तुलना केली आहे. तेव्हा आणि आताचे लिहिताना तिने तिच्या आजच्या लूकची तुलना तिच्या १९९० च्या लूकशी केली आहे. जुन्या फोटोत काजोल पांढर्‍या टॉपसह काळ्या लेदर जॅकेटमध्ये दिसत आहे, तिचे केस विखुरलेले दिसत आहेत. दुसरीकडे, लेटेस्ट फोटोत काजोलने गुलाबी रंगाची सूट पॅन्ट परिधान केली आहे. लांब कानातले आणि सरळ केसांमध्ये अभिनेत्रीचा लूक अप्रतिम दिसत आहे. तेव्हाचा आणि आताचा हा फोटो शेअर करत काजोलने लिहिले आहे, “हेअर स्ट्रेटनर करण्यापूर्वी आणि केस स्ट्रेटनरनंतर.”

काजोलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या दोन्ही लूकचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले की, “फोटो वेगळे असले तरी दोन्हीमध्ये तुझे आकर्षण सारखेच आहे.” त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, “तू आजही तितकीच सुंदर दिसतेस जितकी आधी दिसायची, तुझ्या सौंदर्याला काहीही बिघडवू शकत नाही.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काजोल दिग्दर्शक रेवतीच्या आगामी ‘द लास्ट हुर्राह’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती अखेरची ‘त्रिभंगा’ चित्रपटात दिसली होती. तिच्या अप्रतिम अभिनयामुळे काजोलची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये केली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा