Friday, March 29, 2024

करिश्मा कपूरने लपवली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब? करीना-काजोलच्या संभाषणातून सत्य आले समोर

गेल्या काही काळामध्ये देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा थैमान घातले होते. त्याचमुळे सर्वांचेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता देशभरात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण कमी झाले आहेत. मात्र गेल्या २४ तासांत राज्यात ४६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आज राज्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर येत आहे. करिश्माने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिलेली नाही. मात्र करीना कपूर आणि काजोल यांच्यातील संभाषणातून याचा खुलासा झाला आहे.

काजोल (Kajol) आणि करिनाच्या (Kareena Kapoor) संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये करीना काजोलला सांगताना दिसत आहे की, “लोलोचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.” करिनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने लोलो लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

मेहबूब स्टुडिओबाहेर करीना आणि काजोलची भेट झाली. ज्यामध्ये करीनाने सांगितले की, “आम्ही सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो.” यावर काजोलने सांगितले की, तिलाही कोरोना झाला आहे. दरम्यान, करिश्माच्या (Karisma Kapoor) कोरोना रिपोर्टबाबत करिना लोलोही पॉझिटिव्ह असल्याचे सांगताना दिसली आणि ही गोष्ट पॅपराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हायरल व्हिडिओवर युजर्सने दिल्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर आलेल्या युजर्सच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते पाहून एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “चला बहिणी, चला गप्पा मारू.” दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, “स्थानिक काकू गप्पा मारत आहेत असे दिसते. त्यांच्याकडे फक्त महागड्या गाड्या आहेत.” काहींनी दोघींचे वर्णन गॉसिप क्वीन असे केले आहे तर काहींनी लिहिले आहे की, “चौकाचौकात पंचायत.” तर करिश्माच्या काही चाहत्यांना तिची चिंता सतावू लागली आहे आणि ती लवकर बरी होवो यासाठी प्रार्थना करत आहेत.

गेल्या वर्षी करीना कपूर, अमृता अरोरा आणि करिश्मासह काही सेलिब्रिटी गेट टुगेदरसाठी करण जोहरच्या घरी जमले होते. एका आठवड्यानंतर, करीना आणि अमृता अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. मात्र, करण जोहर किंवा त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यानंतर सर्वांनाच ट्रोल करण्यात आले होते.

हेही वाचा – 

‘माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…’ कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट आली जोरदार चर्चेत

वाह! अरमान मलिक बनला पहिला भारतीय कलाकार, ज्याने ‘यू’ सोबत केले ग्रॅमी ग्लोबल स्पिन

बॉलिवूडमध्ये नेटवर्किंग करण्यात सुश्मिता सेन अपयशी, म्हणूनच मिळाले नाही मनाजोगे काम स्वतः केला खुलासा

 

 

हे देखील वाचा