Saturday, April 20, 2024

काजोलने होळीला दिला पाणी वाचवण्याचा संदेश, नेटकरी म्हणाले ‘तुझा नवरा गुटख्याचा प्रचार करतो त्याला स्वच्छ करण्यासाठी…’

सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपात वाढले आहे. कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले की, नेटकरी त्यांना लगेच ट्रोल करायला सुरुवात करतात. कलाकार या ट्रोलिंगकडे जरी दुर्लक्ष करत असले तरी अनेकदा कलाकार त्यांच्या मुलाखतींमधून ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतात. या ट्रोलिंगपासून महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून लहानमोठे अनेक कलाकार वाचू शकलेले नाही. आता या ट्रोलिंगचा सामना अभिनेत्री काजोलला करावा लागला आहे.

नुकताच संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने होळीचा सण साजरा करण्यात आला. याच निमित्ताने काजोलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काजोलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने होळीच्या निमित्ताने पाणी वाचवण्याचा सल्ला दिला. या व्हिडिओमध्ये तिने हे देखील सांगितले की, “सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाणी वाचवा आणि सुरक्षित होळी खेळा.” या व्हिडिओमुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “काजोल जी होळीच्या निमित्ताने पाणी वाचवण्याचे ज्ञान देत आहे. तिने आधी आपल्या नवऱ्याला समजवावे कारण तो गुटख्याची जाहिरात करतो आणि लोकं गुटखा काहून जमिनीवर भिंतींवर थुंकतात ते साफ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते.” अजून एकाने लिहिले, “एवढेच पाणी वाचवायचे असेल तर तू आठवड्यातून एकदाच अंघोळ कर.” दुसऱ्याने लिहिले, “काजोल जी तुम्ही तुमचे ज्ञान न दिले तरच उत्तम आहे. इतर सणांवर काहीही बोला तुझा नवरा स्वतःच लोकांचे तोंड केसरी करत आहे. बॉलिवूडकरांना फक्त होळीचा दिसते का?” अजून एकाने लिहिले, “यावेळी होळीच्या निमित्ताने काजोलने पाणी वाचवण्याचा विडा उचलला आहे अजय देवगनची वाट लागली.”

काही नेटकऱ्यांनी तर काजोलच्या चित्रपटातील असे सीन व्हायरल केले आहे, ज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले आहे. एका युजरने तर काजोलचे काही फोटो पोस्ट करत लिहिले, “पैसा मिळाल्यावर पाण्याला पाण्यासारखे ओतणारी काजोल आज होळीला पाणी वाचवण्याचा सल्ला देत आहे.” एकाने लिहिले, “माय नेम इज खान सिनेमातील एका सीनसाठी २४ लाख लिटर पाणी वापरण्यात आले होते. आणि होळीला लोकांनी पाणी वाचवले पाहिजे असे सांगितले जाते.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा