Thursday, April 25, 2024

‘माझ्या अंगठीने कितीतरी लोक खरेदी करता येतील’, काजोलच्या वक्तव्याने पेटून उठले नेटकरी; म्हणाले…

प्रख्यात बाॅलिवूड निर्माता करण जोहर याचा अतिशय प्रतीक्षेत असलेला ‘काॅफी विथ करण’ शो कायमच चर्चेत असताे. या शाेमध्ये अनेकदा कलाकारांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण हाेतात. अलीकडेच, अभिनेत्री काजाेल हिचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये काजाेल असं काही बाेलली, जे लाेकांना आवडलं नाही. काजाेलचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री काजाेल (Kajol) करण जाेहरची फार जवळची मैत्रीण आहे. ती करणच्या चॅट शाेमध्ये बऱ्याचदा आली आहे. सध्या करणचा ‘कॉफी विथ करण सीजन 7’ (Koffee With Karan Season 7) चालू आहे. अशातच काजाेलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये करण जाेहर म्हणताे की, “त्याने कधी कजाेलला गावातील मुलीच्या भूमिकेत पाहिलं नाही.” यावर काजाेल प्रतिउत्तर देत म्हणाली, “यावर मी खूप लवकर निर्णय घेतला हाेता की, मी श्रीमंत दिसते. मी गरीब दिसतच नाही. मी काहीही केलं, काहीही घातलं, तरी मी गरीब दिसत नाही. मी घाघरा चाेली घालूनही स्वत:चं निरीक्षण केलं आहे, ज्यात मी अजिबातच गरीब दिसत नाही. मी माझ्या ओमवाल्या अंगठीकडे बघितलं, तर मला कळत नाही, मी किती लाेकांना विकत घेऊ शकते.”

या व्हिडिओमुळे काजाेलला पंचड ट्राेल केले जात आहे. त्यावर एका युजरने कमेंट करत लिहिले, “ती तिच्या जुन्या चित्रपटात गरीबच दिसते.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “ती तिचे जुने दिवस विसरली आहे, ज्यात ती अजिबातच चांगली दिसत नव्हती.” एका युजरने काजाेलला ‘घमंडी’ म्हटले आहे.

काजाेलने ‘बेखुदी’ चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काजाेलचा ताे चित्रपट तर बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप ठरला, पण त्यानंतर तिने, ‘कुछ कुछ हाेता है’, ‘दिलवाले दुल्हनिया जायेंगे’, ‘फना’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत…’, अक्षयबद्दल स्वराचे खळबळजनक वक्तव्य, पण असं का म्हणाली अभिनेत्री?
भोजपुरी क्वीन अक्षरा सिंहने सांगितले व्हायरल एमएमएसचे सत्य; म्हणाली,’मी रडणार नाही…’
अरेरे! फातिमा सना शेखने विकी कौशलसोबत केले असे काही, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा