देशात मागील काही महिन्यांपासून एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे केंद्र सरकारचे ३ कृषी कायदे आणि त्यावरून उभा ठाकलेला वाद. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. अनेक महिन्यांपासून शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर या कायद्याविरोधात आंदोलन करत होते. मात्र, आता शेतकऱ्यांबाबत चांगली बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र, या निर्णयामुळे अभिनेत्री कंगना रणौत भलतीच नाराज झाली आहे. कंगनाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोदींचे वक्तव्य
मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटले की, “मी देशवासियांची माफी मागत, खऱ्या मनाने सांगू इच्छितो की, आमच्या प्रयत्नांमध्ये कमतरता राहिली असेल की, आम्ही त्यांना समजू शकलो नाही. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या संसद सत्रात तीन कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आपापल्या घरी परतावे, शेतात परतावे.”
कंगनाची प्रतिक्रिया
वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही महिन्यांपूर्वी ट्विटरवरून हाकालपट्टी झालेली कंगना रणौत इंस्टाग्रामवर व्यक्त झाली. तिने म्हटले की, “खेदजनक, लाजिरवाणे आणि अगदी चुकीचे… संसदेत बसून सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर हा पण जिहादी देश आहे… ज्यांना हे हवे आहे त्यांचे अभिनंदन.”

शेतकऱ्यांना म्हणाली होती आतंकवादी
यापूर्वी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कंगनाने शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले होते. तिने लिहिले होते की, “पंतप्रधान साहेब, झोपलेल्याला उठवता येईल, गैरसमज असलेल्याला समजावता येईल, पण जो झोपण्याचे सोंग घेत आहे, अज्ञानासारखं वागतोय त्याला तुमच्या स्पष्टीकरणाचा काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत, CAA ने एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही, परंतु त्यांनी रक्ताच्या नद्या वाहिल्या.”
मात्र, या वक्तव्यानंतर कंगनावर जोरदार टीका झाली होती. कंगनाच्या या ट्वीटनंतर #Arrest_Castiest_Kangna यासह अनेक हॅशटॅग ट्रेड होऊ लागले होते. तसेच, कंगनाच्या अटकेचीही मागणी होऊ लागली. तिच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४४, १०९, १५३, १५३ ए आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Actress Kangana Ranaut Is Disappointed After Farm Laws Repeal It Is Dictatorship Is The Only Resolution)
कंगनाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती ‘थलायवी’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता ती सन २०२२ मध्ये तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक
-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे
-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’










