Friday, May 24, 2024

‘मेरी कहानी श्रद्धा वॉकर जैसी’, ‘या’ अभिनेत्रीनं लिव्ह इन रिलेशनशिपवर केला धक्कादायक खुलासा

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण या विषयावर आपले मत मांडत आहे. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड स्टार्सनीही या हत्याकांडावर संताप व्यक्त केला आहे. त्याचवेळी आता ‘दिया और बाती हम‘ फेम अभिनेत्री कनिष्का सोनी हिने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यादरम्यान कनिष्कने तिच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने स्वतःची तुलना श्रद्धा वालकरशी केली आहे.

अभिनेत्री कनिष्क सोनी (kanishka soni ) हिने सांगितले की, “ती श्रद्धा वालकरच्या कथेशी रिलेट करू शकते. एकेकाळी तीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यादरम्यान एका अभिनेत्याने तिला प्रपोज केले होते आणि लग्नाबाबत बोलले होते. जेव्हा कनिष्का अभिनेत्याशी नातेसंबंधात आली तेव्हा तिला अभिनेत्याच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले. दारूच्या नशेत स्वतःचे नियंत्रण नसणाऱ्या अभिनेत्याची दारू पिण्याची सवय आणि स्वभाव तिने सहन केला.”

अभिनेत्रीने सांगितले की, “ती लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाजूने नव्हती. ती ज्या कुटुंबातून आली आहे त्यांना असे एकत्र राहण्याची परवानगी नाही. सुरुवातीला तिने अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिला, परंतु अभिनेत्याने तिला लग्नाचे आश्वासन देत रिलेशनशिपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले. त्यामुळे कनिष्क अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. मात्र, जेव्हा ती अभिनेत्याला लग्नाबद्दल बोलली, त्या दिवशी अभिनेत्याने कनिष्कला रागाच्या भरात खूप मारले होते. त्यावेळी कनिष्क आतून खूप घाबरली होती. एखाद्या दिवशी रागाच्या भरात हा अभिनेता आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो याची तिला खात्री होती. त्याच रात्री कनिष्क गुपचूप तिचे काही सामान घेऊन घरातून पळून गेली.

कनिष्काने देशातील मुलीना संबाेधत म्हंटले की, “आज आपल्या देशातील जे वतावरण आहे, ते लक्षात घेता, असे लक्षात येते की, सर्वजन आपल्या स्वार्थासाठी एकत्र येतात.” कनिष्काने मुलींना सल्ला दिला आहे की, “एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखल्यानंतरच त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घ्या. देशाने कितीही प्रगती केली तरी लिव्ह इनचा निर्णय नीट विचार करूनच घ्या.”

कनिष्काच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले तर, तिने ‘देवी आदि पराशक्ती’, ‘पवित्र रिश्ता’ यासारख्या दमदार मालिकांमध्ये भूमिका साकारल्या हाेत्या.(actress kanishka soni shocking disclosure on her live in relationship shraddha walker aftab poonawalla)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एंगेजमेंटनंतर आयरा खानने बॉयफ्रेंडला केले किस, पाहा व्हायरल व्हिडिओ

बाबाे! निर्मात्याने राहुल रॉयवर केला ‘हा’ माेठा आराेप, पाठवली कायदेशीर नाेटीस, वाचा सविस्तर

हे देखील वाचा