Sunday, May 19, 2024

एंगेजमेंटनंतर आयरा खानने बॉयफ्रेंडला केले किस, पाहा व्हायरल व्हिडिओ

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. आता तिने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. याशिवाय ती एंगेजमेंटनंतर तिच्या बॉयफ्रेंडला किस करतानाही दिसत आहे. याआधी आयरा खानने सप्टेंबरमध्ये नुपूर शिखरेसोबत लग्नाची घोषणा केली होती. 

आयरा खान (ira khan) हिने शुक्रवारी (दि. 18 नाेव्हेंबर)ला तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (nupur shikhare) याच्यासोबत एंगेजमेंट केली. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. एंगेजमेंटसाठी आमिर खान रीना दत्ता, किरण राव, इम्रान खान, निखत खान आणि मन्सूर खान हे सर्व उपस्थित हाेते. दुसरीकडे, जर कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, विजय वर्मा, फातिमा सना शेख, आशुतोष गोवारीकर, गुलशन देवय्या आणि अक्षरा हसन यांसारखे कलाकार देखील या समारंभात उपस्थित हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आता आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावेळी आयरा खानने ऑफ सोल्जर रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघांच्या एंगेजमेंटचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही रिंग सेरेमनीनंतर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. त्याचबरोबर दोघेही एकत्र रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मुस्कान जाफरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, जो आयरा खाननेही पुन्हा शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपूर शिखरेने इटलीत आयरा खानला प्रपोज केले. ते तिथे एका सायकलिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होते. या प्रपोजलचा व्हिडिओही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आयरा खानने फेब्रुवारी 2021 मध्ये नुपूर शिखरेसोबतचे नाते सार्वजनिक केले असून आता हे जाेडपे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. (bollywood ira khan kissed boyfriend nupur shikhare afte engagement both were romantic in dance too see viral photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! अवॉर्ड्स शाेमध्ये असे काय घडले की, रणवीरची आई लागली रडायला?

साऊथच नवीन जाेडपं अडकलं विवाह बंधणात, सोशल मीडियावर अभिनंदनाचा पाऊस

हे देखील वाचा