Tuesday, May 21, 2024

संगीतसृष्टीवर शोककळा! मुलीला सासरी पाठवताच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचे निधन

पंजाबी संगीत इंडस्ट्रीतून मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबी गायक नछत्तर गिल याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नछत्तर गिल याची पत्नी दलविंदर कौरचे निधन झाले आहे. मागील काही काळापासून ती आजारी होती. नछत्तर गिल  याच्या मुलीचे 14 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते. मुलीला निरोप दिल्यानंतर नछत्तर आणि त्याची पत्नी कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत मुलाच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. मुलाचे लग्न 17 नोव्हेंबर रोजी होणार होते. नछत्तर गिलची पत्नी आजारी असूनही लग्नाच्या तयारींमध्ये व्यस्त होती आणि ती खूप खुशही होती. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

असे म्हटले जात आहे की, नछत्तर गिल (Nachhatar Gill) याची पत्नी दलविंदर कौर (Dalvinder Kaur) हिचे 15 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्याच्या एक दिवस आधीच तिने मुलीला निरोप दिला होता. घरात जल्लोषाचे वातावरण होते. कुणालाच माहिती नव्हते की, असे काही होईल. मुलीला निरोप दिल्यानंतर दलविंदर कौर हिने थेट जगाचा निरोप घेतला. आता मुलाचे लग्न 17 नोव्हेंबर रोजी आहे, घरात शोककळा पसरली आहे. अशात नछत्तर गिलच्या मुलाचे लग्न होईल की नाही, याबाबत सध्या कोणतीच माहिती समोर आली नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nachhatar Gill (@nachhatargill)

कर्करोगाने ग्रस्त होती दलविंदर कौर
नछत्तर गिल याची पत्नी दलविंदर कौर दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून तिची तब्येत खूपच खालावली होती आणि त्यामध्ये कोणतीच सुधारणा नव्हती. दलविंदर कौरच्या निधनामुळे पंजाबी संगीत इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण नछत्तर गिलचे सांत्वन करत आहेत. तसेच, त्याला धीर देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nachhatar Gill (@nachhatargill)

कोण आहे नछत्तर गिल?
नछत्तर गिल हा एक गायकच नाही, तर गीतकार आणि संगीतकारदेखील आहे. त्याचे वडीलही गायक होते. ते गुरुद्वारामध्ये कीर्तन करायचे. नछत्तर गिल हादेखील वडिलांसोबत गावातील मंदिरात होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात गायन करायचा. नछत्तरने अनेक पंजाबी सिनेमांमध्येही गाणे गायले आहेत. त्याने 2012मध्ये रिलीज झालेल्या ‘गल सुन हो गया’ या सिनेमाव्यतिरिक्त काही सिनेमात अभिनयातही हात आजमावला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘बिग बाॅस 16’मध्ये घरातल्या सदस्यांवर कुरघोडी करतेय ‘ही’ स्पर्धक
‘तुम्ही मला खूप मौल्यवान गोष्टी शिकवल्या…;’म्हणत, महेश बाबूची मुलगी सिताराने शेअर केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा