Friday, May 24, 2024

‘बिग बाॅस 16’मध्ये घरातल्या सदस्यांवर कुरघोडी करतेय ‘ही’ स्पर्धक

टेलिव्हिजवरील वादग्रस्त गार्यक्रम ‘बिग बस‘ सध्या एक वेगळ्याच वातावरणात प्रदर्शित होत आहे. सध्या घरामध्ये राजाच्या हुकुमावर घर चालणार. आशा प्रकारचा टास्क बिग बॉसने दिला असून घरमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळे चांगलेच वाद पेटताना दिसत आहेत. मात्र, यासगळ्यामध्ये राजाला उपाशी राहावं लागलं. राजाच्या हद्दीमध्ये घरामधील सगळ्यात मोठा नियम देखिल तोडला. मात्र, हे सगळे असून अर्चना गौतम हिने घरातील अनेक सदस्यांचे जगने कठीण करुन ठेवले आहे.

प्रसिद्ध कार्यक्रम बिग बॉस 16 (Bigg Boss) सध्या खूपच चर्चेत आहे. घरामध्ये बिग बॉसने एक नवीन टस्क दिला असून प्रत्येक सदस्य तो टास्क पूर्ण करत आहे. मात्र, अर्चनाच्या वर्तवणूकीमुळे अनेक घरातील सदस्य तिच्या विरोधात उभे झाले आहेत. तिने तिचे काम न केल्यामुळे घरमधील सगळेच सदस्य त्रस्त झाले आहेत. तिच्यामुळे इतर सदस्यांचे जगणे कठीण झाले आहे.

झाले असे की, (दि, 16 नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित झाललेल्या भागामध्ये या आठवड्यातील सादिज खान (Sajid Khan) याची कॅप्टन म्हणजेच राजा पदी निवड झाली आहे. त्याने प्रत्यके सदस्याला त्यांच्या आवडीच्या खोली दिल्या असून शाही शेफ आणि राजाच्या खास लोकांना सोडून घरातील सगळ्या सदस्यांना सगळे काम करावे लागनार आहे. मात्र, अर्चना गौतम घरातील काम करण्यास नकार देत आहे. त्यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांनी तिला धरेवर धरले आहे.

कलर्स टीव्हीने आपल्या आधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दाखवले की, अर्चनाने ड्युटी न केल्यामुळे साजिद खान तिला दंड देण्याची भाषा करतो, यावर प्रियंका चहर चौधरीदेखिल साजिदला पाठिंबा देते म्हणते की, “तुम्ही जर घरातल काम करत नसाल तर तुम्हाला घरामध्ये राहण्याचा काहीच हक्क नाही.”

 

View this post on Instagram

 

अर्चनाच्या अशा वर्तवणूकीमुळे घरातील सगळेच सदस्य खूपच त्रस्त होतात. शिव ठाकरे (Shiv Thakare) रागाच्या भारामध्ये अर्चनाचे पूर्ण सामान बाहेर फेकतो आणि अर्चनाला काम करण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ देतो. मात्र, “अर्चना म्हणते की, माझं जे मन करेल मी तेच करणार.” अर्चणाच्या अशा बोलण्यामुळे सगळेच सदस्य निश्चय घेतात की, आता अर्चनाची मनमानी नाही चालनार. शिव आणि अंकित गुप्ता (Ankit Gupta) अर्चनाचा पूर्ण बेड खराब करतात आणि तिचे कपडे जेलध्ये नेऊन फेकतात. आता हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे की, अर्चनाचा हा वाद कुठपर्यत पोहोचणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुम्ही मला खूप मौल्यवान गोष्टी शिकवल्या…;’म्हणत, महेश बाबूची मुलगी सिताराने शेअर केली भावनिक पोस्ट
बच्चन कुटुंबातील ‘या’ जिवलग सदस्याच्या मृत्युनंतर हळहळले बिग बी, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा