जेव्हा एखादा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असतो, तेव्हा त्या सिनेमासोबतच त्या सिनेमातील कलाकारांचीही चर्चा रंगलेली असतात. असेच काहीसे ‘लाल सिंग चड्ढा‘ या सिनेमाबाबत घडत आहे. या सिनेमातील मुख्य अभिनेत्री करीना कपूर खान सध्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. यामध्ये ती आमिर खान याच्या नायिकेच्या भूमिकेत आहे. तिने माध्यमांशी बोलताना या सिनेमाच्या बॉयकॉट करण्याच्या मागणीसोबतच तिला तिचा मुलगा तैमूर अली खान याच्याबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली.
हॉलिवूड नाही, तर करीनाला साऊथमध्ये करायचंय काम
सध्या अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये कमी आणि हॉलिवूड तसेच साऊथच्या सिनेमांमध्ये जास्त काम करताना दिसत आहेत. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हीदेखील असेच करणार का? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, “मी याबद्दल कधीही विचार केला नाहीये. माझ्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. माझ्याकडे २ मुलांची जबाबदारी आहे. त्यामुळे असे होणार नाही की, मी तोंड घेऊन कुठेही जाईल. जोपर्यंत परदेशात जाण्याची बाब आहे, आता भारतीय सिनेमे जगभरात पाहिले जाता. त्यामुळे परदेशी सिनेमात काम करण्याची गरज काय आहे? हो, पण साऊथचे सिनेमे चांगले आहेत. त्यांची कहाणी आणि प्रेक्षकवर्ग यातील कनेक्शन जबरदस्त आहे. त्यामुळे मी साऊथच्या सिनेमांमध्ये आणि त्यातील कलाकारांसोबत काम करू इच्छिते.”
‘तैमूर तर भोळा मुलगा आहे’
करीना आणि तिचा पती सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यापेक्षा त्यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) जास्त चर्चेत असतो. याबद्दल बोलताना करीना म्हणाली की, “तैमूरला मीडियाचे अटेंशन अजिबात आवडत नाही. तो मला म्हणतो की, मी आणि त्याचे वडील तर प्रसिद्ध आहेत तसेच, तो प्रसिद्ध नाहीये. मग फोटोग्राफर्स त्याचे फोटो का काढतात. तो फक्त ५ वर्षांचा आहे. प्रत्येकजण त्याला स्टार म्हणून पाहतो. मात्र, तो एक भोळा मुलगा आहे. त्याचं तो सर्वकाही समजून घेईल आणि आयुष्यात पुढे चांगलं काम करेल.”
View this post on Instagram
‘कृपया सिनेमा पाहा’
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हे ट्रेंड करत आहे. याबद्दल करीना म्हणाली की, “हे खूप विचित्र आहे. कृपया सिनेमा बॉयकॉट करू नका. हा खूप चांगला सिनेमा आहे. आमिर, मी आणि सर्वांनीच खूप मेहनतीने सिनेमा बनवला आहे. कृपया हा सिनेमा पाहा.”
View this post on Instagram
‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आमिर आणि करीनाव्यतिरिक्त मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक
‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य
अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय