बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर ही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. करीना अनेकदा तिचे हाॅट फोटो शेअर करून इंटरनेटवर आग लावते, पण कधी कधी करीना ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. यावेळीही असेच काहीसे घडले. करीना कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
अलीकडेच करीना कपूर (Kareena Kapoor) हिचा एका व्हिडिओ व्हायरल झाला हाेता, ज्यात करीना हातात चहाचा ग्लास घेऊन चालताना दिसत हाेती. या व्हिडिओमुळे तिला खूप ट्राेल करण्यात आले. मात्र, करीनाला याचा काहीही फरक पडत नाही. हे तिने एका नवीन व्हिडिओच्या साहाय्याने सिद्ध केलं आहे. या नवीन व्हिडिओमध्येही ती हातात चहाचा ग्लास घेऊन जाताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये करीना राखाडी रंगाच्या मॅक्सी गाऊन ड्रेसमध्ये दिसत असून काळ्या रंगाचा गाॅगल लावला आहे. या लूकमध्ये करीना खूप हाॅट दिसत आहे. एकीकडे चाहते करीनावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर तिला चहाचा ग्लास पकडल्यानं चांगलंच ट्राेल करत आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसते की, करीना कपूर चहाचा ग्लास घेऊन तिच्या गाडीकडे वळत आहे. करीनाचा हा व्हिडिओ जवळपास मागच्या व्हिडिओ सारखाच आहे. आता युजर करीनाला या सवयीसाठी ट्राेल करत आहेत. एकाने म्हटले की, “ही बाई इतकी बिझी आहे का, गाडीतही चहा पिते. मूर्खपणा.” त्याचवेळी दुसऱ्या एका युजरने करीनाला ट्रॅव्हल कप घेण्याचा सल्ला देत कमेंट केली. युजरने लिहिले, “कृपया तिला ट्रॅव्हल कप पाठवा. गाडी उडी मारेल आणि हा चहा तिच्यावर पडेल.” आणखी एका युजरने लिहिले की, “हा चहा कॉफीसोबत रोज कुठे फिरते?”
View this post on Instagram
करीना कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बाेलायचे झाले, तर करीना अखेरची आमिर खानसाेबत ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसली हाेती. आता ती सुजाॅय घाेषच्या ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, ज्यात करीनासह जयदीप अहलावत आणि विजय वर्मा दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्या अंगठीने कितीतरी लोक खरेदी करता येतील’, काजोलच्या वक्तव्याने पेटून उठले नेटकरी; म्हणाले…
नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ
‘त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत…’, अक्षयबद्दल स्वराचे खळबळजनक वक्तव्य, पण असं का म्हणाली अभिनेत्री?