Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यांनी शानदार लग्न करत खर्च केला पाण्यासारखा पैसा

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत असून, टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतची अनेक प्रसिद्ध जोडपी लग्न बंधनात अडकत आहेत. आपले लग्न अतिशय आलिशान आणि संस्मरणीय करण्यासाठी कलाकार कोणतीही कसर सोडत नसल्याचे दिसते. लग्नात अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. अलिकडेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाने चांगलेच लाईमलाइट मिळवले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील ७०० वर्षे जुन्या बरवारा किल्ल्यात झालेल्या या लग्नाच्या चर्चा देश-विदेशात सुद्धा रंगल्या होत्या. हे लग्न इतके भव्य होते की, अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नाआधी अशीच आणखी काही लग्ने झाली आहेत, ज्या लग्नांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते. या यादीत प्रियंका चोप्रापासून अनुष्का शर्मापर्यंतचा समावेश आहे. चला तर मग बॉलिवूडमधील सर्वात महागड्या लग्नांची यादी पाहूया.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra – Nick Jonas)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. माध्यमांतील वृत्तानुसार, हे बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे लग्न आहे. एका अंदाजानुसार या लग्नात १०५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे लग्न इतके शाही होते की, भारतापासून ते अमेरिकेपर्यंत त्याची चर्चा रंगली होती.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone – Ranveer Singh)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचेही नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न झाले होते. इटलीच्या लेक कोमोमध्ये झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पैसा पाण्यासारखा वाहत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, दीपवीर वेडिंगचे बजेट ९५ कोटी रुपये होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma – Virat Kohli)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडला. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि अगदी जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या लग्नाचे बजेट शाही लग्नापेक्षा कमी नव्हते. माध्यमांतील वृत्तानुसार, या लग्नात ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty – Raj Kundra)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या लग्नाची देखील बॉलिवूडमधील सर्वात महागड्या लग्नांमध्ये गणना केली जाते. ज्याचे बजेट ८० कोटी असल्याचे सांगितले जाते. मुंबईजवळ झालेल्या या लग्नाच्या चर्चा आजही रंगत आहेत.

Photo Courtesy: Instagram/theshilpashetty

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai – Abhishek Bachchan)

संपूर्ण मुंबईत ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यात आला. २००७ मध्ये मुंबईच्या रस्त्यावर अभिषेकची मिरवणूक निघाली, तेव्हा संपूर्ण बॉलिवूडच मिरवणूकी बनले होते. त्यावेळी १४ वर्षांपूर्वी झालेल्या या लग्नाचे बजेट ४० कोटी रुपये असल्याचे माध्यमांतील वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा :

भूतलावर जणू अप्सरा अवतरली! सई ताम्हणकरचे फोटो पाहून तुमच्याही तोंडातून निघतील हेच उद्गार

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

वाढदिवशी कोणतेही कॅप्शन न देता शाहनाझने केला सिद्धार्थचा फोटो शेअर, सिडनाझ पुन्हा चर्चेत

 

हे देखील वाचा