‘वाट बघतोय रिक्षावाला’ या व्हिडिओमुळे सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) होय. तिच्या अभिनयाने आणि खास करून डान्समुळे तिने सर्वत्र तिची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोव्हर्स आहेत. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल होत असतो. तिच्या सौंदर्याने ती नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. अशातच नवीन गाण्याच्या टिझर व्हिडिओ समोर आला आहे.
सागरिका म्युझिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मानसी गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मानसीला टॅग केले आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “हुडहुडी लवकरच फक्त सागरिका म्युझिकवर.” तिचा हा १५ सेकंदाचा व्हिडिओ पाहून ही गोष्ट लक्षात येत आहे की, ही एक लावणी असणार आहे. या लावणीला गायिका वैशाली सामंत हिने आवाज दिला आहे. लग्नानंतर मानसी पहिल्यांदा कोणत्यातरी म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. या गाण्यात तिला पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून गाण्याप्रती उत्सुकता दर्शवत आहेत. (manasi naik’s hudhudi song release soon on sagrika music)
मानसीने या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले आहे. तिने प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. तो एक मॉडेल आणि बॉक्सर आहे. लग्नानंतर ती नेहमीच तिच्या पतीसोबत फोटो शेअर करत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी मानसीच्या दिराचे लग्न झाले आहे. त्यावेळी देखील साजशृंगार करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.
मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.
हेही वाचा :
- रसिका सुनीलने केले मालदीवमधील थ्रोबॅक फोटो शेअर, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव
- ‘चल रे घोड्या टुगुडुक टुगुडुक!!’ माधवी निमकरने घोडयावर बसून केला फोटो शेअर, चाहते म्हणाले…
- ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर जय अन् उत्कर्षने केली ‘ही’ अतरंगी डिमांड पूर्ण, एक नजर टाकाच