वाढदिवशी कोणतेही कॅप्शन न देता शाहनाझने केला सिद्धार्थचा फोटो शेअर, सिडनाझ पुन्हा चर्चेत


‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth shukla) अनपेक्षित झालेल्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता. या सगळयात त्याची अगदी जवळची मैत्रीण शहनाज गिल  (Shehnaaz gill) ही सदम्यात गेली होती. एवढया तरुण आणि धडाडीच्या अभिनेत्याचे निधन होईल असा कोणी विचार देखील केला नसेल. रात्री झोपलेला सिद्धार्थ सकाळी उठला तेव्हा मृत्यू पावला आहे. हे ऐकून सगळ्यांना दुःखद धक्का बसला होता. यानंतर अनेक दिवस शहनाझ मीडियासमोर आली नाही तसेच कोणत्या प्रोजेक्टमध्ये देखील केले नाही. काही दिवसांपूर्वी तिचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. अशातच तिने सिद्धार्थच्या वाढदिवशी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शहनाझने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सिद्धार्थला पंख दिसत आहेत. तसेच मागून त्याच्यावर प्रकाश पडला आहे. हा फोटो शेअर करून तिने कोणतेही कॅप्शन दिले नाही. परंतु त्यांचे चाहते मात्र या फोटोवर जोरदार कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचा हा फोटो व्हायरल भयानीने देखील त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. (Shehnaaz gill share a special photo on sidharth shukla’s birthday)

सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले. परंतु त्याला बिग बॉसने खास ओळख निर्माण केउन दिली. या शोमध्ये त्याची आणि शहनाझची मैत्री खूप गाजली होती. त्यांची जोडी देखील सगळ्यांना खूप आवडत होती. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाझ’ हे नाव दिले होते. त्यांना एकत्र पाहायला सगळ्यांना खूप आवडत होते. यानंतर तो सर्वत्र प्रसिद्ध झाला.

त्याचा मृत्यू २ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या बातमीनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली होती. शहनाझला या धक्यातून सावरायला बराच काळ लागला. अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘तू यही है’ हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवला होता. हा म्युझिक व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

हेही वाचा :

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

काय सांगता! शक्ती मोहन नव्हे, तर ‘ही’ आहे राघव जुयालची गर्लफ्रेंड; रोमॅंटिक फोटो आले समोर

‘बिग बॉस’ फेम रुबीना दिलैकने केले दु:ख व्यक्त, मजबुरीमुळे विकावी लागली घरे आणि कार

 


Latest Post

error: Content is protected !!