भूतलावर जणू अप्सरा अवतरली! सई ताम्हणकरचे फोटो पाहून तुमच्याही तोंडातून निघतील हेच उद्गार


मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

सईने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबत तिने केसांची वेणी घातली आहे आणि वेणीवर पांढऱ्या रंगाचे स्टार्स लावले आहेत. कानात हिरव्या रंगाचे ईअरिंग घातले आहेत, तसेच पायात पांढऱ्या रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक आणि स्टनिंग दिसत आहे. (Sai Tamhankar share her photos on social media)

 

 

तिचा हा लूक फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड २०२१ मधील आहे. तिचा हा तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “सुंदर मनमोहक अभिनेत्री.” हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

 

 

सईने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

हेही वाचा :

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

रसिका सुनीलने केले मालदीवमधील थ्रोबॅक फोटो शेअर, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

‘चल रे घोड्या टुगुडुक टुगुडुक!!’ माधवी निमकरने घोडयावर बसून केला फोटो शेअर, चाहते म्हणाले…

 


Latest Post

error: Content is protected !!