Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफने शेअर केला ‘निर्भया पथका’चा व्हिडिओ, ‘मुंबई पोलिस’ची ‘ही’ क्लिप मनाला करेल स्पर्श

कॅटरिना कैफने शेअर केला ‘निर्भया पथका’चा व्हिडिओ, ‘मुंबई पोलिस’ची ‘ही’ क्लिप मनाला करेल स्पर्श

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणे पसंत करते. कामाबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकताच कॅटरिनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई पोलीस अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी ‘निर्भया पथक’ही सुरू केले आहे.

व्हिडिओमध्ये मुंबईच्या रस्त्यावर वेगवेगळ्या वयोगटातील महिला त्यांच्या कामातून बाहेर पडताना दिसत आहेत. तिथे काही टपोरी त्यांच्या मागे चालताना दिसत आहेत. महिला त्यांच्या फोनवरून १०३ डायल करतात आणि त्याच ठिकाणी पीसीआर महिलांच्या मागे उभा राहतो. त्यानंतर मुंबई पोलीस टपोरींना धडा शिकवतात, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

कॅटरिना कैफने व्हिडिओ केला शेअर
हा व्हिडिओ कॅटरिनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “निर्भया पथक मुंबई शहरातील महिलांच्या सेवेसाठी तयार आहे, त्यांच्यासाठी बनवलेले आहे. महिलांसाठी १०३ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. महिलांनी कोणत्याही अडचणीत या हेल्पलाइनचा वापर करावा. तुमच्या स्पीड डायलमध्ये नेहमी १०३ नंबर जोडा.”

‘या’ कलाकारांनी मुंबई पोलिसांचा संदेश पोहोचवला लोकांपर्यंत
कॅटरिना कैफशिवाय शाहिद कपूर (Shahid Kapoor), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनीही मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शाहिद म्हणाला की, “मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी हे आवश्यक पाऊल उचलले आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या स्टोरीमधून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर त्याचवेळी विकी कौशलने मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचा व्हिडिओ शेअर करत महिलांनी त्यांच्या फोनच्या स्पीड डायलमध्ये नेहमी १०३ नंबर सेव्ह करावा, असे आवाहन केले. वेळ आल्यावर हे कामात येऊ शकते, असेही त्याने सांगितले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा