Saturday, June 29, 2024

काय सांगता! पती विकी कौशलच्या ‘या’ सवयीमुळे नाराज आहे कॅटरिना कैफ, अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक म्हणजे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आहे. दोघेही डिसेंबर महिन्यात त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. अशा परिस्थितीत कॅटरिना लग्नानंतरच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. सध्या कॅटरिना तिच्या ‘फोन बूथ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत कॅटरिना कैफने लग्नानंतर कोणत्या गोष्टी शिकल्या हे सांगितले. यासोबतच कॅटरिनाने तिचा पती विकी कौशलची एक सवय सांगितली, जी तिला अस्वस्थ करते. 

लग्नानंतर खूप काही शिकली कॅटरिना
‘फोन बूथ’ (phone bhoot) या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी बाेलताना कॅटरिना कॅफ (katrina kaif) हिने एका मुलाखतीत लग्नानंतर खूप काही गोष्टी शिकल्याचे सांगितले. मुलाखतीच्या रॅपिड फायर राउंडमध्ये कॅटरिनाने सांगितले की, “मी भांडण आणि वादाच्या वेळी शांत राहायला शिकले आहे. मी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देते. यासोबतच लग्ना नंतर मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.” विकी कौशलबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांगताना, कॅटरिना कैफ म्हणाली की, “जेव्हा विकी काेणत्या गाेष्टीसाठी आग्रह करतो तेव्हा मी नाराज होते. बाकी विकी हा एक चांगला जोडीदार आहे आणि मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे.”

लग्नापूर्वी कॅटरिनाचे नाव रणबीरसाेबत जाेडले हाेते
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (vicky kaushal) काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर, गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी तिने विकी कौशलशी लग्न केले. या लग्नाची साेशल मीडियावर खूप चर्चा झाली. लग्नापूर्वी कॅटरिना कैफचे नाव रणबीर कपूर (ranbir kapoor) सोबतही जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की, दोघेही बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. मात्र, आता कॅटरिना आणि विकि काैशलच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या दबंग खानला जिवे मारण्याच्याच्या धमकीमुळे एनआयनं दिली वायप्लस सुरक्षा

तब्बल 3 वर्षानंतर प्रियंकाचे भारतामध्ये आगमन, आल्याबरोबर व्यक्ती केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा