कॅटरिनाने खोलली विकी कौशलची पोल, म्हणाली तो खूपच सिंपल स्वभावाचा…

0
71
katrinakaif
photo courtesy: instagram/katrinakaif

बॉलिवूडची क्वीवन कॅटरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. ही नुकतीच अभिनेता विकी कौशल सोबत लग्नबंधनात अडकली आहे. कॅट्रीना सोसल मीडियावर खूप सक्रिय असते, ती सतत तिचे आणि विकीचे रॉमांटिक फोटो शेअर करत असते. त्यामुळे लग्नानंतर या दोघांचे आयुष्य कसे चालले आहे हे प्रत्येकालाच जाणून घेण्याची इच्छा असेत. सध्या अभिनेत्री आपल्या नवीन चित्रपटमुळे खूपच चर्चेत असेत. त्यामुळे तिच्या वैयक्तीक आयुष्यामध्ये काय चालले आहे हे सगळ्यांनाच जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते.

सध्या अभिनेत्री लग्नानंतर पहिल्यांदाच नवीन चित्रपट ‘फोन बूथ’ मध्ये झळकणार आहे. त्यामुळे कॅट खूपच चर्चेत आली आहे. विकी आणि कॅटने एकत्र स्क्रीन शेअर केली नसली, तरी त्यांचे प्रेम वैयक्तीक आयुष्यात दिसून येतं. अभिनेत्री आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये  तिने आपला पती विकीसोबतच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने विकीच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले असून ती आपल्या मॅरिड लाइफमध्ये खूपच खुश दिसत आहे.

तिने विकी बद्दल सांगितले की, “विकी खूपच मनमोकळ्या स्वभावाचा आहे. आम्ही आमच्या कामाद्दल खूप गोष्टी करतो. आम्ही एकमेकांची खूप थट्टा करतो.” यानंतर तिने विकीची खास गोष्टी सांगितली की, “मला वाटत आहे की, विकी बद्दल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, तो स्वत:ला जास्त प्रेशर देत नाही, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी खूपच सिंपल आणि सहज आहेत. कोणतेच टेंशन नाही.” असे म्हणत तिने विकीचे खूप कौतुक केले.

कॅटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच विजय सेतुपति याच्या ‘क्रिसमस’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगच्या आधीच मला एकदा उजळनी करायची होती तेव्हा विकीने तिला खूप मदत केली. या गोष्टीबद्दल माहिती देत असताना तिने सांगितले की, “या चित्रपटाचा पहिला सीन 3 पानांचा होता, ज्यामध्ये खूप मोठ मोठे डायलॉग होते, मला सेटवर जाण्यापूर्वीच याची उजळणी करायची होती. तेव्हा विकीने मला विचारले की, मी विजयच्या ओळी बोलू शकतो का? तेव्हा मी याच्यासाठी हा म्हणाले, आणि विकीने फक्त दोनवेळेसच स्क्रीप्ट वाचली आणि त्याने न चुकता पुर्ण डायलॉग बोलत सिन पुर्ण करुन दाखवला.”

अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. त्यामुळे चाहते कॅटरिनाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. तिचा नवीन चित्रपट फोन बुथ  4 नोव्हेंबरला चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या नावामुळे नाही, तर कामातून यशस्वी होण्यावर ठेवते विश्वास!
बीग बॉसने दिलाओपन चॅलेंज! शिव ठाकरेची कॅप्टेन्सी हिसकावून अर्चना सांभाळणार घराची जबाबदारी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here