Tuesday, February 18, 2025
Home अन्य सारा अली खानवर भारी पडली साउथची सुंदरी, विकी कौशलच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

सारा अली खानवर भारी पडली साउथची सुंदरी, विकी कौशलच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीच्या बहुचर्चित कुंटुंबाची स्टारकिड सैफ अली खान याची मुलगी आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवीडमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ती सतत आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिने काही दिवसांपूर्वी साउथचा सुरस्टार धनुष सोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटामध्ये काम केले होते. ती नवीन चित्रपटात ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा‘ या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल सोबत झळकणार होती. मात्र, या चित्रपटातून साराची सुट्टी झाली आहे.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याचा नवीन चित्रपट ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. मात्र, या चित्रपटाला घेऊन एक मोठी बातमी समोर येत आहे. हा चित्रपट कोल्ड स्टोरेजमध्ये गेला होता, पण आता अशा बातम्या येत आहेत की, या चित्रपटाच्या शुटिंगचे काम सुरु होत असून यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्यासोबतच एक मोठा बदल करत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) होती पण आता हा निर्णय बदलण्यात आला आहे .

अनेक दिवसापासून ‘अश्वत्थामा’ चित्रपट खूप चर्चेत होता. त्यामुळे चाहतेही हा चित्रपट बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. माहितीनुसार असे समोर येत आहे की, हा चित्रपट पुढच्यावर्षी प्रदर्शित करण्यात येइल. माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार होती मात्र, दिग्दर्शकाला विकी कौशलपेक्षा जास्त मोठी दिसणारी अभिनेत्री हवी होती त्यामुळे सारा अली खानला या चित्रपटामधून बाहेर काढले आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या स्रिप्टमध्येही मोठा बदल केला आहे. पूर्वीच्या स्रिप्टनुसार तरुण स्त्री पात्र चित्रपटामध्ये दाखवायचे होते म्हणून साराची निवड केली होती. पण आता कथामध्ये भरपूर बदल करण्यात आले त्यानुसार अशी अभिनेत्री हवी आहे जी वयाने विकीपेक्षा मोठी दिसेल. त्यानुसार दिग्दर्शकाने अभिनेत्री समंथा रुथ प्रभु (Sammantha Ruth Prabhu) हिचे नाव सुचवले आहे पण यावर अजून दिग्दर्शकाने काहीच माहिती दिली नाही.

vicky kaushal

रिपोर्टरच्या माहितीनुसार अभिनेत्री जरी बदलली असली तरी अभिनेता मात्र, विकी कौशलच आहे. त्याच्या भूमिकेमध्ये काहीच बदल केले नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार करत आहे. निर्मात्याच्या मते, “चित्रपटाची कथा सगळ्यात महत्वाची आहे, जी आजच्या काळामध्ये गरजेची आहे. विक्कीचा मोठा चाहता वर्ग आहे तो लोकांमध्ये त्याची चांगली छाप आहे. अशामध्ये जर त्याची बदल करायचे म्हटलं तर काही अर्थच नाही.”

माहितीनुसार शुटिंगचे काम सुरु झाले आहे. ही कथा महाभरताच्या अश्वत्थामा आधारित आहे, आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शासनामध्ये कोणत्याच धर्माला स्थान नसले पाहिजे,’ म्हणत संगितकार विशाल ददलानीने केजरीवालवर केली टीका
कृतीच्या साडी लूकवर नेटकरी फिदा!

हे देखील वाचा