Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

विकी कौशल आणि कॅटरिना कैफने केला नवीन घरात गृहप्रवेश, अनुष्का-विराटचे होणार शेजारी

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडपे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टवर या जोडप्याने ९ डिसेंबरला अखेर ही जोडी खासगी समारंभात विवाह बंधनात अडकली. हे लग्न खूप हाय प्रोफाईल होते. पण या लग्नाला अगदी जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. लग्नानंतर कॅटरिना आणि विकीने त्यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. नुकताच लग्नानंतर कॅटरिनाने तिच्या सासरच्या घरी पहिला पदार्थ बनवला होता. त्याचा देखील फोटो व्हायरल झाला. आता या नवविवाहित जोडप्याने जुहूमध्ये एक अपार्टमेंट घेतले असून, नुकतीच त्यांच्या या घरी छोटी पूजा देखील झाली. या गृहप्रवेशाच्या पूजेसाठी दोघेही त्यांच्या नवीन घरी पोहोचले होते.

विकी कॅटरिनाच्या गृहप्रवेशावेळी कुटुंब होते एकत्र 

नवविवाहित जोडपे कॅटरिना आणि विकी यांनी त्यांच्या स्वप्नातल्या घरात प्रवेश केला आहे. दोघेही गृहप्रवेशाच्या पूजेसाठी पोहोचले. यादरम्यान विकी कौशलचे वडील श्याम कौशल आणि आई वीणा हे देखील गृहप्रवेशच्या पूजेसाठी अपार्टमेंट बाहेर दिसले.

कॅटरिना-विकी बनणार विराट-अनुष्काचे शेजारी

लग्नानंतर कॅटरिना आणि विकी या दोघांनीही आपले नवीन घर घेतले असून, या जोडप्याने जुहूच्या पॅलेसमध्ये मागील ५ वर्षांपासून एक अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ते लवकरच या घरी शिफ्ट होणार असल्याने, कॅटरिना आणि विकी आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे शेजारी बनणार आहेत. या गोष्टीचा उल्लेख खुद्द अनुष्काने एका पोस्टमध्ये केला आहे. अलिकडेच, अनुष्काने कॅटरिना आणि विकीला त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, ‘लवकर घरी या जेणेकरून आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकू येऊ नये.’

‘इतके’ लाख देणार भाडे 

विकी आणि कॅटरिनाने जुहू येथील आठव्या मजल्यावर ५ वर्षांसाठी भाड्याने अपार्टमेंट घेतले आहे. या अपार्टमेंटसाठी विकी आणि कॅटरिनाला पहिल्या तीन वर्षांसाठी दरमहा ८ लाख रुपये मोजावे लागतील. या जोडप्याने सुरक्षा म्हणून १.७५ कोटी रुपये जमा केले आहेत. विकी कॅटरिनाचे हे सी फेसिंग घर ६ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

हेही वाचा :

यावर्षी ‘या’ कलाकारांच्या मृत्यूच्या उडाल्या होत्या अफवा, अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा देखील होता समावेश

सुपरस्टार कलाकारांचे २०२१ मध्ये ‘हे’ सिनेमे ठरले सुपरफ्लॉप, अनेक अनपेक्षित चित्रपटांचा देखील आहे समावेश

‘पिंजरा’ ते ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असा आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

 

हे देखील वाचा