Saturday, September 30, 2023

लग्नानंतर सलमान खानसोबत शूटिंगसाठी ‘या’ ठिकाणी जाणार कॅटरिना कैफ, १५ दिवसांचे असणार शेड्यूल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी नुकतेच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी शाही पद्धतीने लग्न केले. हे जोडपे मुंबईत परतले असून, सतत चर्चेत असते. त्याचे कारण म्हणजे दोघेही लग्नानंतर ब्रेक न घेता कामावर परतणार आहेत. होय, कॅटरिना लवकरच सलमानसोबत ‘टायगर ३’च्या शूटिंगसाठी १५ दिवसांच्या शेड्यूलवर निघणार आहे.

‘टायगर ३’चे शूटिंग होणार दिल्लीत
माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिना लवकरच सलमान खान (Salman Khan) सोबत आगामी चित्रपट ‘टायगर ३’ चे शूटिंग दिल्लीत सुरू करणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण आधीच झाले आहे. आता पुन्हा कॅटरिना आणि सलमान या सुपरहिट फ्रँचायझीवर काम करणार आहेत.

नवीन वर्षात कामाला होणार सुरुवात
याआधी कॅटरिना आणि सलमानने रशिया, तुर्की, ऑस्ट्रिया आणि मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित आगामी स्पाय थ्रिलर ‘टायगर ३’ आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, दोघे जानेवारीच्या मध्यापासून दिल्लीत चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचे शूटिंग करतील. दिल्लीत जवळपास १५ दिवस या चित्रपटाचे शूटिंग चालणार असल्याचीही माहिती आहे. (after marriage katrina kaif is going to this place for a shoot with salman khan will have a 15 day schedule)

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनतोय चित्रपट
हा आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफसोबत इमरान हाश्मी (Emraan Hashmi) देेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, शूटिंगची तयारी सुरू करण्यात आली आहे जेणेकरून शेड्यूल कोणत्याही अडचणीशिवाय सुरळीतपणे पूर्ण करता येईल. कारण सलमान आणि कॅटरिनाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे दोघांचे संरक्षण सांभाळणेही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. चित्रपटातील दोघांचे फोटो लीक होण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कॅटरिना आणि विकीने ९ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. ७ डिसेंबरपासून विवाहसोहळा सुरू झाला आणि त्यात ‘मेहंदी’, ‘हळद’ आणि ‘संगीत’ या विधींचा समावेश होता. त्यांच्या लग्नानंतर, दोघांनी लग्नाच्या सोहळ्यातील हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा