बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणे पसंत करते. कामाबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही बिकिनी फोटो शेअर केले होते. आता या बिकिनीची माहिती समोर आली आहे. तिने घातलेली बिकिनी समुद्राच्या कचऱ्यापासून बनवल्याचे सांगितले जात आहे. त्याची किंमत ११ हजार रुपये आहे.
दिल्लीस्थित फॅशन लेबलने केली आहे डिझाइन
कॅटरिनाने (Katrina Kaif) दिल्लीस्थित रिसॉर्ट फॅशन लेबल गुआपाने डिझाइन केलेली निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. ही एक रिव्हर्सेबल (दोन्ही बाजूंनी परिधान करता येणारी) बिकिनी आहे, ज्यामध्ये रिवर्सेबल त्रिकोणी निळ्या आणि हिरव्या रंगाचा टॉप आहे. या बिकिनीमध्ये कॅटरिना खूपच हॉट दिसत होती.
अशी केली स्टाईल
कॅटरिनाने ही बिकिनीसह मोकळे केस सोडले असून, सोन्याची चेन घातली होती. टॉपसोबत कलर-ब्लॉक्ड हाई वेस्ट बॉटम वियर होता, ज्यामध्ये कॅटरिनाचे टोन्ड पाय आकर्षक दिसत होते. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा सी-थ्रू शर्ट घातला होता.
कॅटरिनाने फॉलो केली पर्यावरणीय फॅशन
कॅटरिनाचा हा पोशाख पर्यावरणीय फॅशनला प्रोत्साहन देत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हा स्विमिंग ड्रेस समुद्र आणि लँडफिल कचऱ्यापासून सापडलेल्या सस्टेनेगल इकोनिल यार्नपासून बनवण्यात आला आहे. त्याची किंमत १०,९०० रुपये आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुंबईतील पोलिसांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी बनवलेल्या ‘निर्भया पथका’ची माहिती दिली होती.
‘या’ चित्रपटांमध्ये लवकरच दिसणार आहे कॅटरिना
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कॅटरिना लवकरच ‘टायगर ३’, ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘टायगर ३’ चित्रपटातील बहुतांश सीन्स शूट करण्यात आले आहेत. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा-